महाराष्ट्रात विधानसभा(political) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उलाढाली होत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक मोठा धक्का बसला आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी मुंबईत उध्दव ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
दीपक साळुंके यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना(political) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवारांच्या शिलेदाराने मशाल हातात घेतल्याने महायुतीचे चांगलेच टेन्शन वाढले आहे.
याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून सांगोला विधानसभेसाठी दीपक साळुंके यांची उमेदवारी देखील घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पक्ष सोहळ्याच्या याप्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्यावर देखील टिकेच्या तोफा डागत दीपक साळुंके यांच्या पक्षप्रवेशाचं स्वागत केलं आहे.
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक भाकीत केलं आहे. सांगोल्यात गद्दारांच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार असे ते म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, ”ज्या एका गद्दाराला महाराष्ट्रातील झाडी डोंगर दिसले नाही आणि दुसऱ्या राज्यातलं झाडे डोंगर दिसले. मात्र आता त्या झाडाच्या मुळाखाली त्याला गाडायचे आहे”, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
याशिवाय आबा आता तुमच्या हातात मशाल दिलेली आहे. मग आता ही मशाल कशी पेटवायची आणि नेमके कोणाला चटके द्यायचे, हे तुम्ही ठरवायचे असे बोलून सांगोल्यातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दीपक आबांना उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा:
JioCinema आणि Disney Hotstar यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माणसाला काठी तुटेपर्यंत मारले, Viral Video
‘सॉरी मम्मी, पप्पा…’ लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि…