मौल्यवान धातू सोन्यामध्ये (gold)गेल्या काही दिवसांपासून चढ-उताराचे सत्र दिसून येत आहे. जागतिक घडामोडीमुळे सोने-चांदीच्या किमतीमध्ये चढ-उतार होत आहे. चांदीत मध्यंतरी 2 हजार रुपयांची वाढ दिसून आली. तर सोन्याचे भाव तेजीत दिसून आले. दसऱ्यात आणि नवरात्रीत सोन्याच्या किमतीमध्ये नवा विक्रम झाला. या काळात सोनं महाग होत गेलं. दसऱ्यानंतर आता दिवाळीची प्रतिक्षा लागली आहे.
मात्र, सोनं (gold)अजूनही वरचढच दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला 15 ऑक्टोबर रोजी सोनं 220 रुपयांनी स्वस्त झालं. 16 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा 490 रुपयांची वाढ झाली. तर आज 17 ऑक्टोबररोजी देखील दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोनं 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सप्टेंबर महिन्यात चांदीचे भाव स्थिर होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात चांदी पुन्हा वधारली. 5 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी उतरली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. या आठवड्यात चांदीमध्ये कोणतेच बदल झाले नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोनं 76,553, 23 कॅरेट 76,246, 22 कॅरेट सोनं 70,123 रुपयांवर घसरलं. 18 कॅरेट आता 57,415 रुपये, 14 कॅरेट सोनं 44,784 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा:
SBI ने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! लोन झालं स्वस्त
मोठी बातमी : चर्चित IRS अधिकारी समीर वानखेडे सुरू करणार राजकीय इनिंग
आचारसंहितेत निर्णय जाहीर, शिंदे सरकारला भोवणार? आयोगाकडून कारवाईचे संकेत