कोल्हापूर : राज्यातील शाळांमध्ये पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांच्या(Students) आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली असून, शालेय पोषण आहार खाल्ल्याने काही विद्यार्थिनींना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील विद्यामंदिर माळवाडी प्राथमिक शाळेत ही घटना घडली. पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींना(Students) प्रकृती अस्वस्थ वाटू लागली आणि त्यांना तातडीने कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
नागरिक व पालकांचा संताप
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शालेय पोषण आहारात वारंवार दगड, अळ्या आणि निकृष्ट दर्जाचे अन्न आढळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दररोज मुलांना शिळे आणि करपलेले अन्न दिले जात असल्याने प्रशासनावर कठोर टीका केली जात आहे.

पालकांची प्रशासनाला धारेवर धरले
घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले. “तुम्ही विद्यार्थ्यांना शिळे अन्न देता का? करपलेला भात आणि अळ्या असलेला पोषण आहार विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर परिणाम करत आहे. त्यावर कोण कारवाई होणार?” असे आक्रमक सवाल पालकांनी उपस्थित केले.
प्रशासनाची प्रतिक्रिया
शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा :
मराठीत न बोलण्यावरून वाद; मनसे कार्यकर्त्यांकडून डी-मार्टच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण
सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हातावर प्लास्टर, स्वतः खुलासा करत दिली माहिती, दुखापतीचा व्हिडिओ व्हायरल
सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेअंतर्गत पात्र महिला व वृद्धांना मिळणार ‘एवढी’ रक्कम!