नांदेडमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. उपसरपंचानेच 16 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी उपसरपंचाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वय 16 वर्ष असून आरोपीचे वय 55 वर्ष आहे. आरोपी हा गावचा उपसरपंच आहे. आरोपीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर तरुणी गर्भवती राहिली होती त्यानंतर तिने नऊ महिन्यांनी मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर आरोपीने ते बाळ विकल्याचा संशय आहे. तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.
आरोपी बाबूराव तुपेकर याने वर्षभरापूर्वी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून लैंगिक अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिली आणि महिनाभरपूर्वी तिची प्रसूती करण्यात आली. पिडीत मुलीने जन्म दिलेल्या बाळाला विकल्याचा संशय आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी उपसरपंच बाबूराव तुपेकर याला अटक करण्यात आलीये. पुढील तपास पोलीस करताहेत.

चोपडा शहरानजीक असणाऱ्या गोरगावले रस्त्यावरील परिसरात कामासाठी आलेल्या आदिवासी समाजाच्या पाच वर्षातील बालिकेवर पंचवीस वर्षाच्या नराधमाने ती खेळत असताना तिला जबरदस्तीने झोपडीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सदर आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्याला मारहाण झाल्यामुळे उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याने तिची प्रकृती देखील खराब झाली होती मात्र तिच्या उपचार सुरू असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून सदर नराधमावर पोक्सो आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! सांगलीत जयंत पाटलांना धक्का; ‘या’ दिग्गज नेत्यांचा आज भाजप प्रवेश
मोठी बातमी ! साताऱ्यातील ‘हा’ बडा नेता करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा? पत्नी शूरासोबतच्या क्लिनिक बाहेरील Viral Video