अशा होणार लढती

राज्यातील लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याच्या मतदानाला उद्या सुरुवात(start) होणार आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी या 11 मतदारसंघांत मतदान होणार आहे.

नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोपाल पाडवी, भाजपच्या हीना गावीत आणि वंचितच्या हनुमंतपुमार सूर्यवंशी यांच्यात लढत होणार आहे. जळगावध्ये शिवसेनेचे करण पवार आणि भाजपच्या स्मिता वाघ यांच्यात थेट लढत होणार आहे. वंचितचे युवराज जाधव हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रावेरमध्ये एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपच्या रक्षा खडसे यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीराम पाटील यांच्याबरोबर होणार आहे. वंचितचे संजय ब्राह्मणेही रिंगणात आहेत. (start)जालनामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यात लढत आहे. वंचितचे प्रभाकर बकलेही रिंगणात आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. वंचितने इथे अशोक हिंगेपाटील यांना उभे केले आहे.
– छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची थेट लढत शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील आणि वंचितचे अफसर खानही रिंगणात आहेत.
– मावळमध्ये शिवसेनेचे संजय वाघेरे-पाटील यांची थेट लढत शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्याशी होणार आहे. वंचितकडून माधवी जोशी उभ्या आहेत. पुणे मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याशी लढत होणार आहे. मनसेमधून वंचितमध्ये गेलेले वसंत मोरे हेही याच मतदारसंघातून उभे राहिल्यामुळे तिहेरी लढत होणार आहे.

– शिरुरमधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांची लढत अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याशी होणार आहे. नगरमध्ये राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांची लढत भाजपचे सुजय विखे-पाटील यांच्याशी होणार आहे तर शिर्डीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाप्चौरे यांची लढत शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांच्याशी होणार आहे. वंचितकडून उत्कर्षा रुपवते याही रिंगणात आहेत.

हेही वाचा :

ह्रदयद्रावक! उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन

संजयकाका पाटील की विशाल पाटील? नेमका कौल कोणाला? सांगली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावली चक्क दुचाकींची पैज!

चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?