डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना, अचानक दिसणे झाले बंद, प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

अभिनेत्री जस्मिन भासिन खतरो के खिलाडी ९ तसेच बिग बॉस १४ या कार्यक्रमांतून(actress) अधिक नावारूपास आली. या कार्यक्रमांमधील तिच्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे तिला आणखीन लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्री (actress)जस्मिन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. डोळ्यात लेन्स लावताना तिच्या डोळ्यांना झालेल्या त्रासामुळे तिला चक्क दिसणे बंद झाल्याची माहिती तिने स्वतः तिच्या चाहत्यांना दिली आहे. डोळ्यातील कॉर्निया डॅमेज झाल्यामुळे तिला हा त्रास झाला असल्या़चा डॉक्टरांचा दावा आहे.

या गोष्टीविषयी सांगताना जस्मिन म्हणाली की, 17 जुलैला ती एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होती. यावेळी तयार होत असताना, डोळ्यामध्ये लेन्स लावल्यावर तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. लेन्स घातल्यानंतर डोळे अचानक जळू लागले. त्यावेळी तिला असे वाटत होते की, तिने ताबडतोब डॉक्टरांकडे गेलं पाहीजे . पण तिने आधी कार्यक्रमाला जाणे उचित समजले, नंतर डॉक्टरांकडे जाऊ असे ठरवलं. पण असे करणे तिला महागात पडले. जस्मिन म्हणाली की, “मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते, माझी टीम मला पूर्ण कार्यक्रमात मदत करत होती कारण काही वेळानंतर मला दिसणेच बंद झाले होते.”

डोळ्यांच्या स्पेशलिस्ट कडे गेल्यांनतर तिच्या डोळ्यांतील कॉर्निया डॅमेज झाले असल्याची बाब समोर आली. यांनतर तिच्या डोळ्यांना बँडेज लावण्यात आले. यापुढील उपचार मुंबईमध्ये घेण्यासाठी अभिनेत्री मुंबईला रवाना झाली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे कि जस्मिनचे डोळे पुढील ४ ते ५ दिवसांत बरे होऊन जातील.

अभिनेत्रीने डोळ्याच्या सध्याच्या परिस्थितीवर सांगितले आहे कि तिला अजूनही प्रचंड वेदना होत आहेत. तिचे म्हणणे आहे कि तिला रात्रीचे झोपणेही कठीण झाले आहे. तिने कामावर लवकरच पुन्हा रुजू होण्याची आशाही व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरातील शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला

अविवाहित असतानाच गरोदर, सत्य लपवलं; बाथरुममध्ये प्रसूती करताना तरुणीचा मृत्यू

आज ‘या’ 5 राशींवर राहणार शनीची कृपा, प्रत्येक कामात मिळणार दुप्पट लाभ