कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब माने यांचा रुकडीचे सरपंच(politics), जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते खासदार असा एकूण राजकीय प्रवास. तत्कालीन खासदार दत्ताजीराव कदम यांच्या आकस्मिक निधनानंतर बाळासाहेब माने यांना खासदार पदाने साद घातली. ते खासदार झाले. पण त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसमधील विरोधकही वाढले. त्यामध्ये काही साखर सम्राट होते. विशेषतः रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा त्यांना विरोध होता. या सर्वांनी मिळून 1989 च्या लोकसभा निवडणुकीत आप्पासाहेब तथा सा.रे. पाटील यांना छुपा पाठिंबा देऊन बाळासाहेब माने यांच्या विरोधात उभा केले होते.
आप्पासाहेब तथा सा रे पाटील हे काँग्रेसचे(politics) निष्ठावान असले तरी विचाराने ते समाजवाद्यांशी जोडले गेले होते. एस एम जोशी यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध ते काँग्रेसमन कमी आणि समाजवादी जास्त होते. दत्त सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष. त्यांना खासदार व्हावयाचे होते पण काँग्रेस कडून उमेदवारीची माळ बाळासाहेब माने यांच्या गळ्यात पडत होती. 1989 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली.
अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार असलेल्या बाळासाहेब माने यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली. सा.रे. पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण त्यांना ती मिळाली नाही म्हणून ते नाराज झाले. काही साखर सम्राटानी, सा. रे. पाटील यांना बंडखोरी करण्यास भाग पाडले. त्यांनी मग हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांना गरुड हे निवडणूक चिन्ह मिळाले होते.
रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे त्यांना छुपे समर्थन होते . त्यांनी मतदारसंघांमध्ये सा. रे. पाटील यांच्यासाठी चांगली फिल्डिंग लावली होती. सा रे पाटील यांच्या मागे बाळासाहेब माने यांचे विरोधक सर्व प्रकारची रसद घेऊन उभा होते. त्यामध्ये एक अपक्ष आमदारही होते. काँग्रेसचे अनेक नेते बाळासाहेब माने यांच्या प्रचारात उतरले होते. काँग्रेस हाय कमांडने रत्नाप्पाण्णा कुंभार यांनाही माने यांच्या प्रचाराची सभा घेण्यास सांगितले होते. त्यांच्या एक दोन सभा झाल्या.
या सभेत रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सा.रे. पाटील यांचा अतिशय खुबीने काँग्रेसच्या(politics) व्यासपीठावरून प्रचार केला होता.”आपण सा.रे. एक आहोत. पक्षाला मतदान करा”असे त्यांनी आवाहन केले होते. पक्षाला म्हणजे सा रे पाटील यांच्या गरुड पक्षाला मतदान करा असे त्यांनी अतिशय खुबीने सांगितले होते. त्यांचा हा छुपा प्रचार काँग्रेस नेत्यांना समजला होता पण रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यावर ते शिस्त रंगाची कारवाई करू शकले नाहीत.
बाळासाहेब माने विरुद्ध आप्पासाहेब तथा सा रे पाटील यांच्यातील लोकसभा निवडणूक तेव्हा प्रचंड गाजली होती. काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना नमवून बाळासाहेब माने यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती. आणि त्यांना विरोध करणारे साखर सम्राट पराभूत झाले होते. आप्पासाहेब तथा सा रे पाटील हे शिरोळ मतदार संघातून विधानसभेवर निवडून जायचे. विधिमंडळातील सर्वात वयोवृद्ध सदस्य म्हणून त्यांना आपली नोंद करवून घ्यायची होती. तथापि उल्हास पाटील यांच्याकडून ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यांचे एक वैशिष्ट्य असे होते की ते काँग्रेस पेक्षा समाजवादी पक्षात अधिक लोकप्रिय होते. त्यांना काहीजण “साथी “असे सुद्धा म्हणायचे.
आप्पासाहेब तथा सा रे पाटील यांनी देशातील सहकारी तत्त्वावरील पहिले वृत्तपत्र काढले होते. दैनिक इंद्रधनुष्य असे त्या वृत्तपत्राचे नाव होते आणि स्वतः सा रे पाटील हे संपादक होते. याशिवाय सहकारी तत्त्वावरील काही व्यापारी संस्था ही त्यांनी स्थापन केल्या होत्या.
हेही वाचा :
सावधान, झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करताय?.
शुबमन गिल ज्या तरुणीला पाहून गालात हसला, ‘ती’ कोण अखेर समोर आलंच
भाजप कार्यकर्त्याने माझा हात धरला, माझी साडी खेचली; काँग्रेसच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप