कोल्हापूरात साखर कारखान्यांचा ‘एफआरपी’प्रमाणे दर जाहीर

वारणानगर : कोल्हापूर जिल्ह्यातील23पैकी 22 साखर कारखाने(Sugar factories) सुरु झाले असून गाळप हंगाम 2024-25 करिता ऊसदर (एफ.आर.पी.) जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16 सहकारी व 7 खासगी असे एकूण 23 साखर कारखाने असून, सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत.या अनुषंगाने पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये 15 नोव्हेंबर 2024पासून राज्यातील गाळप हंगाम सुरू झाले आहेत.

आजपर्यंत ऊस बील विलंबाचे व्याज कारखान्यानी दिले का ? ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार कारखान्यांनी हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाचे 14 दिवसात देय एफआरपी प्रमाणे ऊस किंमत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करणे प्रत्येक कारखान्यावर ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 मधील कलम 3 (3) च्या तरतूदीनुसार बंधनकारक आहे.

14 दिवसाच्या कालावधीत एफआरपी देयके अदा न केल्यास कलम 3(3अ) अनुसार विलंब कालावधी करीता 15 टक्के प्रमाणे होणारे व्याज आकारण्याची तरतूद आहे असे सहसंचालक गोपाळ मावळे यांनी नमूद केले आहे.

तथापि 14 दिवसापेक्षा अधिक जादा दिवसाने ऊस बील अदा केलेल्या कारखान्यानी लांबलेल्या बिलावर व्याज दिले का ? याची दखल घेऊन साखर(Sugar factories) सहसंचालक कार्यालयाने विलंबाचा अहवाल तयार करून किती कारखान्यांना विलबांचे व्याज बील द्यायला भाग पाडले याचा जाहिर खुलासा या कार्यालयाने करणे गरजेचे आहे.

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व 21 फेब्रुवारी2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या एफ.आर.पी. दरापेक्षा जास्त दर द्यावयाचा असल्यास कारखान्यांनी तो निश्चित करुन हंगाम सुरु करण्यापूर्वी त्या दराची माहिती वर्तमानपत्र व कारखाना स्थळावर प्रसिध्द करणे बंधनकारक आहे.

या नियमाची एकाही साखर कारखान्याने अंमलबजावणी केलेली नाही सर्वच कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे पहिली एकरकमी उचल जाहीर केली आहे. त्यामुळे जादा दराच्या नियमाला बगल दिल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. बहुतांश साखर कारखान्यानी गळीत हंगाम समाप्त झालेवर जादा दराबाबत आश्वस्त केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एफआरपी प्रमाणे दर
राजाराम बावडा (3050 ) शेतकरी आजरा (3100 )छ. शाहू कागल (3100) मंडलिक हमीदवाडा (3100)इको केन चंदगड (3100) संताजी बेलेवाडी (3100)अथनी शुगर तांभाळे (3100) दौलत हलकर्णी (3100) ओलम चंदगड (3100) दत्त शिरोळ (3140) आवाडे हुपरी (3150) शरद नरंदे (3150) डॉ. डि वाय पाटील (3150) गुरुदत्त टाकळी (3150) भोगावती परिते (3200) दूध गंगा बिद्री (3200) ओंकार शुगर फराळे (3200)ता.को.वारणा (3220) उदयसिंह बांबवडे (3220) कुंभी कुडीत्रे (3300) पंचगंगा इचलकरंजी (3300) दत्त दालमिया (3300) नलवडे गडहिग्लज जाहिर नाही.

हेही वाचा :

दोन मित्रांनी दारूच्या नशेत केली आई व मुलाची हत्या, परिसरात खळबळ

रोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती?, आताच्या घडीची महत्त्वाची घडामोड

Squid Game Season 2 दरम्यान नेटफ्लिक्सकडून सर्वात मोठी चूक; लक्षात येताच केलं डिलीट