अमरावती : शेतजमिनीचा मोबदला न मिळाल्याने सालोड येथील एका शेतकऱ्याने(farmer) येथील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिलीप रामकृष्ण ढगे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.20) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
सदर शेतकऱ्याला(farmer) तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. रामकृष्ण तुकाराम ढगे व इतर यांची गट क्रमांक 137 मधील क्षेत्रफळ 6.74 हे. आर. ए सामाईक शेतजमीन निम्म साखळी बृहत लघु पाटबंधारे योजना प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 2021 मध्ये गेली. सदर शेत जमिनीचा 1 कोटी 85 लाख 46 हजार 350 रुपयांचा मोबदला हा संबंधित शेतकऱ्यांना आपसी वादविवाद असल्याने प्रशासनाकडून देण्यात आला नाही.
स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत सदर सामाईक शेती असलेल्या शेतकऱ्यांना 16 ऑक्टोबर रोजी हक्कासंबंधित दस्तऐवज घेऊन उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. परंतु, नंतर शेतजमिनीचा मोबदला न मिळाल्याने सालोड येथील एका शेतकऱ्याने येथील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
हेही वाचा:
सरकारचा महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘त्या’कठीण दिवसांत मिळणार पगारी सुट्टी
IPL 2025 चं मेगा ऑक्शनचं ठिकाण ठरलं! भारताबाहेर होणार लिलाव
अभिषेक बच्चन घेऊन येतोय एक इमोशनल चित्रपट, “बी हॅप्पी”चे पहिले पोस्टर आऊट!