आयपीएलमध्ये 700 हून अधिक धावा कुटणाऱ्या विराट कोहलीची बॅट वर्ल्ड कपमध्ये चालेना झालीये. टीम (team) इंडियाने खेळलेल्या तिन्ही सामन्यात विराट कोहलीला एकूण 5 धावा करता आल्या आहेत. आयर्लंडविरुद्ध 1 धाव, पाकिस्तानविरुद्ध 4 धावा तर युएसएविरुद्ध विराटला भोपळा देखील फोडला आला नाहीये. त्यामुळे आता टीम इंडियाच्या चिंता वाढल्या आहे. विराट कोहली मागील तिन्ही सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला आला होता. त्यामुळे आता विराटने वन डाऊनला म्हणजेच तिसऱ्या फलंदाजीच्या क्रमांकावर खेळावं का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. अशातच आता माजी स्टार खेळाडू सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले Sunil Gavaskar ?
मागील काही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नसली तरी देखील विराट कोहलीने डावाची सुरुवात करत राहायला हवं, असं मत सुनील गावस्कर यांनी नोंदवलं आहे. कारण विराट कोहली पॉवर प्ले ओव्हर्समध्ये धावा करू शकतो आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून देऊ शकतो. सहा ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाच्या उणिवेचा फायदा करून घेण्यास विराट तयार असेल. जर तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायला गेला तर त्याला अवघड जाईल. त्यामुळे त्याने सलामीला येऊनच धावा कराव्यात, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे.
विराट कोहलीच्या टॅलेंन्टवर कोणीही संशय घेऊ शकत नाही. फक्त त्याला काही वेळ खेळपट्टीवर टिकून राहण्याची गरज आहे. युएसएविरुद्ध सौरभ नेत्रावळकरने विराटची विकेट घेण्यासाठी चांगली गोलंदाजी केली होती, असंही सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. पहिल्या तीन सामन्यात कमी धावा झाल्या म्हणून नाराज होण्याची गरज नाही. आत्ता फक्त सुरूवात आहे. विराट आगामी सुपर 8 मध्ये उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांच्या आयपीएलवेळी वादयुद्ध रंगलं होतं. कोहलीला आत्ता सल्ला देणाऱ्या याच गावस्करांनी विराट कोहलीला स्ट्राईक रेटवरून डिवचलं होतं. त्यानंतर विराटने देखील गावस्करांना बॅटिंगमधून उत्तर दिलं होतं. अशातच आता गावस्कर विराटच्या बचावासाठी मैदानात उतरले असल्याचं दिसून येतंय.
हेही वाचा :
मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले “ नावं घेऊन तुमचे उमेदवार पाडणार”
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क माणसाचं कापलेलं बोट…