जावयाच्या वाढदिवसानिमित्त हटके फोटो शेअर करत सुनील शेट्टी म्हणाला, “हे एक कनेक्शन आहे …”

प्रसिद्ध क्रिकेटपटू केएल राहुलचा आज (18 एप्रिल) वाढदिवस(happy birthday) आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते केएल राहुलला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता अभिनेता सुनील शेट्टीनं देखील सोशल मीडियावर एक हटके पोस्ट शेअर करुन जावयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील शेट्टीच्या या खास पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सुनील शेट्टीने केएल राहुलच्या वाढदिवसानिमित्त(happy birthday) इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सुनील शेट्टी, त्याचा मुलगा अहान शेट्टी आणि जावई केएल राहुल हे तिघे सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. या फोटोला सुनील शेट्टीनं कॅप्शन दिलं, “आपल्या आयुष्यात काय आहे ते नाही, तर आपल्या जीवनात कोण आहे हे महत्त्वाचे आहे.

आम्हाला धन्यता वाटते कारण तू आमच्या कुटुंबात आहेस, हे एक कनेक्शन आहे जे सांगण्यापलिकडचे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल. लव्ह यू बेटा”

Kl Rahul

अहान शेट्टीनेही देखील एक खास पोस्ट शेअर करुन केएल राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केएल राहुलसोबतचा फोटो शेअर करुन अहाननं कॅप्शनमध्ये लिहिलं,’हॅप्पी बर्थडे ब्रदर’.अहाननं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि केएल राहुल कूल लूकमध्ये दिसत आहेत.

23 जानेवारी 2023 रोजी केएल राहुल आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अथिया शेट्टीचे लग्न झाले. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 2015 मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटाच्या माध्यमातून अथियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.मुबारका आणि मोतीचूर चकनाचूर या चित्रपटांमध्ये अथियानं काम केलं आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर लोकसभेत याराना सेफ ..!

CSK ला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

महाराष्ट्र हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर