आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे गेल्याने अनेक ठिकाणाहून गळती सुरू झाली आहे. अंतराळ स्थानकाला ५० हून अधिक भेगा वाढल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या सर्व अंतराळवीरांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये बऱ्याच दिवसांपासून होत असलेल्या किरकोळ गळतीने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. अंतराळ स्थानकात ५० हून अधिक तडे गेल्याचे तपासात समोर आले आहे. नासाच्या लीक झालेल्या अहवालानुसार, आयएसएसवरील धोका वाढत असून तेथे उपस्थित असलेले सर्व अंतराळवीर पूर्णपणे सुरक्षित नाहीत. या अहवालामुळे नासाची चिंता वाढली आहे. नासाने सांगितले की, स्पेस स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडत आहे, ही धोक्याची घंटा आहे. मात्र, नासा अंतराळविरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या या प्रयोगशाळेत सूक्ष्म कंपने होत असल्याचा इशारा रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसने दिला आहे. नासाने देखील पुष्टी केली आहे की स्पेस स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात हवा गळती होत आहे, ही एक धोक्याची घंटा आहे. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी नासा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
तथापि, नासा आणि रशियन एजन्सी रोस्कोमोस (Roscosmos) यांचे या समस्येचे खरे कारण काय आहे यावर एकमत होऊ शकलेले नाही. वरिष्ठ नासा अंतराळवीर बॉब कबाना यांनी सांगितले की, दोन्ही एजन्सींनी या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे, परंतु अद्याप तोडगा काढण्यावर कोणतेही एकमत झालेले नाही.
सुनीता विल्यम्स जूनपासून त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्यासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दोघेही १५० हून अधिक दिवसांपासून अडकून पडले आहेत.
दोन्ही अंतराळवीरांनी ५ जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले आणि ६ जून रोजी आयएसएसवर पोहोचले. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ते परतण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांच्या प्रकृतीची माहिती देताना नासाने पुन्हा एकदा दिलासादायक बातमी दिली आहे. अंतराळात उपस्थित असलेले सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे नासाने म्हटले आहे.
हेही वाचा :
‘स्वप्न पूर्ण होतात’, प्रियंका, दीपिका-आलियानंतर हॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री करणार डेब्यू
पाकिस्तानी चाहत्याकडून मीका सिंगला भेट: 3 कोटींचं घड्याळ, सोनं आणि हिऱ्याची अंगठी
सातारच्या पावसाची पुनरावृत्ती इचलकरंजीच्या निकालाची पुनरावृत्ती करणार…..?