सनीचे 2024-25 मध्ये पाचपेक्षा जास्त सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सनी लिओनी(actor) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी आता नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सनी लिओनीमध्ये बराच बदल झाला असून तिने बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे. सनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. आता तिच्या कारकिर्दीतील एक अतिशय रोमांचक टप्पा अनुभवत असून तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकल्यास कळेल की मुख्यतः बॉलीवूडमधील तिच्या कामासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री विविध स्क्रिप्ट्स मध्ये सध्या काम करतेय ‘कोटेशन गँग’ या तमिळ चित्रपटातील तिची झलक याचा पुरावा आहे. सध्या सनी 2024 आणि 2025 मधल्या पॅक शेड्यूल मध्ये व्यस्त आहे.

तिच्या प्रभावी रोस्टरमध्ये विविध आणि आव्हानात्मक भूमिकां आहेत. तर पाचपेक्षा जास्त हाय-प्रोफाइल प्रकल्पांचा समावेश आहे. बहुप्रतिक्षित प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘कोटेशन गँग’ ज्यामध्ये सनी(actor) एका निर्दयी मारेकरीची भूमिका साकारणार आहे. तामिळ चित्रपटाव्यतिरिक्त ती ‘पेट्टा रॅप’ ची वाट पाहत आहे. ज्यामध्ये ती प्रतिष्ठित प्रभुदेवासोबत डान्स फ्लोअर शेअर करणार आहे.तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांचा ‘बॅडस रविकुमार’ आणि शीर्षक नसलेला मल्याळम प्रोजेक्ट देखील आहे. यापलीकडे ती ‘शेरो’मध्ये दिसणार आहे, ज्याचे तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत.

जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीने या वर्षी ‘टेंट’ देखील आहे, जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तिच्याकडे दोन शीर्षक नसलेले प्रकल्प आहेत, जे 2025 मध्ये रिलीज होणार आहेत. सनी लिओनीची आगामी फिल्मोग्राफी तिच्या उल्लेखनीय प्रतिभेचा पुरावा आहेत यात शंका नाही. ती या नवीन भूमिकांमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना चाहते आणि समीक्षक सगळेच तिच्या आगामी प्रोजेक्ट ची वाट बघत आहेत.

लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनीने बॉलीवूडमध्ये अगदी कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सनीच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. तर आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असून 30 ऑगस्ट रोजी सनी लिओनी स्टारर ‘कोटेशन गँग’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सनी या चित्रपटामध्ये एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. सनी लिओनीच्या या चित्रपटाची वाट पाहत असणाऱ्या प्रेक्षकांसह अनेकांनी ‘कोटेशन गँग’ सारखी भूमिका निवडल्याबद्दल सनीचे कौतुक केले आहे. ‘कोटेशन गँग’ मध्ये सनी अशा महिलांची भूमिका साकारणार आहे जी कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये माहिर आहे.

हेही वाचा:

ठरलं तर! ‘या’ दिवशी रोहित शर्मा उचलणार WTC ची गदा

मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर

धावत्या ट्रेनसोबत सेल्फीचा नाद तरुणीला पडला महागात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप