सुपरस्टार अभिनेता(actor) प्रभासचा देशासह विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रभास लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रभास लवकरच लग्न करणार असल्याची माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. प्रभास नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. आता त्याच्या लग्नाच्या बातम्या समोर येत असल्याने फॅन्स खूपच खूश झाले आहेत. दरम्यान, प्रभासची होणारी पत्नी कोण असणार यासंदर्भातही चर्चांना उधाण आलं आहे.
अभिनेता(actor) प्रभासच्या लग्नाबाबत प्रभासचे काका ज्येष्ठ अभिनेते कृष्णन राजू यांची पत्नी श्यामला देवी यांनी हिंट दिली आहे. प्रभासच्या काकी श्यामला देवी यांनी प्रभासच्या लग्नाबाबत दिलेल्या अपडेटमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात त्यांनी मीडियासोबत बोलताना प्रभासच्या लग्नाच्या विषयावर चर्चा केली. प्रभास लवकरच लग्न करणार आहे. 123 तेलगूच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या काकी श्यामला देवी यांनी सांगितलं आहे की, लवकरच प्रभासच्या लग्नाची घोषणा होणार आहे. प्रभास लवकरच चाहत्यांसोबत ही मोठी बातमी शेअर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
प्रभास लवकरच लग्नाची घोषणा करणार आहे. दरम्यान, श्यामला देवी यांना प्रभासच्या भावी पत्नीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आता चाहते सोशल मीडियावर प्रभासच्या लग्नाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. याआधी श्यामला देवी म्हणाल्या होत्या की, प्रभासने लग्न करावं असं संपूर्ण कुटुंबाला वाटतं आहे. पण, योग्य वेळ आल्यावर त्याचं लग्न होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
प्रभासच्या काकूने त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. श्यामला देवी म्हणाल्या की, प्रभासच्या लग्नाची घोषणा लवकरच होऊ शकते. यामुळे आता सोशल मीडियावर प्रभासचं लग्न आणि त्याची होणारी पत्नी हा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. चाहते याबाबत तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर लग्नाची तारीख विचारण्यास सुरुवात केली आहे.
प्रभासच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रभासच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर अनेक वेळा अफवा पाहायला मिळतात. एका मुलाखतीत प्रभासने त्याच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली होती. प्रभास त्यावेळी म्हणाला की, ‘मी लवकर लग्न करणार नाही, कारण मला माझ्या महिला चाहत्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत. प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे.
हेही वाचा:
3 अज्ञातांकडून युवकाचे अपहरण; कारमध्ये बसवलं अन्…
भारतीय क्रिकेट संघाचा चिंता ठरला हार्दिक पांड्या, व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्क
नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर, अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला