वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे नवीन वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली असून, पुढील सुनावणीची तारीखही निश्चित केली आहे.

नवीन वक्फ कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने या कायद्याला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

या स्थगितीमुळे नवीन कायद्याची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) या प्रकरणी केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. केंद्र सरकारला या कायद्याबाबत आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावे लागणार आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता निश्चित करण्यात आली आहे. त्यावेळी केंद्र सरकारचे उत्तर आणि इतर बाबी विचारात घेऊन न्यायालय पुढील निर्णय देईल.

हेही वाचा :

कंगणा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत होती रिलेशनमध्ये; स्वत: केला मोठा खुलासा

आईच्या कुशीत निजलेल्या चिमुकलीला बिबट्याने उचललं…

रील बनली पण जीव गेला! पाण्याच्या प्रवाहाने क्षणार्धात महिलेला आत खेचले…थरारक Video Viral