स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापुंना ‘सु्प्रीम’ दिलासा; 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर

2013 सालच्या बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव हा जामीन देण्यात आला असून, आसाराम यांनी पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये आणि अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या अनुयायांना भेटू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

आसाराम बापुंना 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या कनिष्ठ न्यायालयाने(Supreme Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून आसाराम बापू तुरुंगात आहेत.

आसारामच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अनेकवेळा अर्ज दाखल केले आहेत. केवळ वैद्यकीय कारणांचा विचार करता येईल, असे न्यायालयाचे स्पष्ट म्हणणे आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला जाणार नाही. शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. त्यानंतर आज कोर्टाने आसाराम बापूंना सशर्त जामीन मंजूर केला आहे. तसेच जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा :

प्रसिद्ध अभिनेत्रीचा लैंगिक छळावर खुलासा: अचानक माझ्या अंडरवेअरमध्ये हात टाकला

सुप्रिया सुळे यांचा गंभीर सवाल: “मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही?”

मोठी बातमी; ‘या’ महिलांना आता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ