भर उन्हात सुप्रिया सुळेंचं आंदोलन, नेमकी मागणी काय?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र (protest)बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केले आहे. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने सुप्रिया सुळे यांनी हे पाऊल उचलले आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सध्या त्याचे क्राँक्रिटीकरण करावे, दुरुस्ती करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र शासन आणि प्रशासनाकडून केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. यामुळे या विरोधात सुप्रिया सुळे यांचे उपोषण सुरू आहे. याआधीही प्रशासनाच्या सातत्यपूर्ण अनास्थेला कंटाळून अखेर ४ मार्च रोजी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

मात्र त्यापूर्वी ३ मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल, असा शब्द दिला होता. त्यामुळे काही कालावधीसाठी मी हे उपोषण स्थगित केल होतं. पण महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुप्रिया(protest) सुळे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

…तोपर्यंत मी अन्नत्याग करेन
जोपर्यंत कामाचे वर्क ऑर्डर निघत नाही, तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे. सध्या ऊन वाढत चाललं आहे. मी अन्न खाणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे भर उन्हात आंदोलन करण्यासाठी बसल्या आहेत. त्यांनी डोक्यावर पदर घेऊन उन्हात उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी अन्नत्याग करेन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या आंदोलनादरम्यान जितेंद्र दुडी यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाला यश मिळावे आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी बनेश्वरमधील ग्रामस्थांनी मंदिरात जलाभिषेक आणि विधिवत पूजा केली. शिवलिंगावर (protest)अभिषेक करून गावकऱ्यांनी देवाला साकडे घातले. प्रशासनाच्या अनास्थेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रशासनाची भूमिका काय?
श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे. सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

हेही वाचा :

सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच आक्रमक,आयुक्तांना आग्रही राहण्याचे निवेदन.

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणार

झापुक झुपूक सुरज आणि किंग कोहली आले समोरासमोर, Video Viral