अवघ्या महाराष्ट्राला ‘गुलीगत धोका’ या डायलॉगने हसवणारा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये प्रचंड गाजला आहे. कारण सुरज चव्हाण त्याच्या प्रसिद्ध डायलॉगने आणि टास्कमध्ये उत्तम खेळून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशातच आता सुरज चव्हाणने भूमिका साकारलेला एक चित्रपट(new movie) प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे सुरज पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालणार असल्याचं दिसून येत आहे.

सध्याच्या युगात प्रेमीयुगुलांवर आधारित असणारा राजा राणी या सिनेमात(new movie) सुरज चव्हाणने भूमिका साकारली आहे. आता या सिनेमातील ‘थोडासा भाव देना’.हे गाण प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झालं आहे. ‘राजा राणी’ हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर पासून सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट येण्यापूर्वीच चित्रपटाच्या गावरान कथानकाने सर्वांचीच उत्सुकता वाढविली आहे.
आता या पाठोपाठ चित्रपटातील मुख्य नायक आणि नायिकेभोवती फिरणाऱ्या कथेवरील गाण्याने अवघ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेयसीला मनवण्यासाठी प्रियकराचं असलेलं प्रचंड प्रेम या गाण्यातून पाहायला मिळत आहे.
या रोमँटिक गाण्यात रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावत आहे. तर या गाण्यात आपल्या मित्राला प्रेमामध्ये पाठिंबा देताना ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाण आणि सैराट फेम तानाजी गलगुंडे दिसत आहे.
‘राजा राणी’ चित्रपटातील ‘थोडासा भाव देना’ या गाण्याच्या संगीताची जबाबदारी ही पी. शंकरम यांनी पार पडली आहे तर पार्श्वसंगीताची जबाबदारी ही विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक अशा गाण्याला हर्षवर्धन वावरे याने त्याच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे.
हेही वाचा:
निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; बडा नेता देणार सोडचिठ्ठी
जिल्ह्यात रात्रीचे फिरतात संशयित ड्रोन? नागरिकांमध्ये पसरली दहशद
आता आदिवासी उतरले रस्त्यावर आणखी एक जातकलह