भारत – दक्षिण आफ्रिका Live सामन्यात राडा, 6.8 फूट उंच खेळाडूशी भिडला सूर्या video

भारत(India) विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी 20 सीरिज सुरु असून यातील पहिला सामना हा शुक्रवारी पार पडला. डर्बनमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 61 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र चालू सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि साऊथ आफ्रिकेचा फलंदाज मॅक्रो जॅनसन यांच्यात जोरदार वाद झाला. दोघे एकमेकांसमोर येऊन ठाकले होते, सध्या या प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारत (India)विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरु असताना भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आफ्रिकेचा फलंदाज मॅक्रो जॅनसन यांच्यात दुसऱ्या इनिंगच्या 15 व्या ओव्हरला वाद झाला. सूर्यकुमार यादवने डीप मिडविकेटने थ्रो केला जो कलेक्ट करण्यासाठी संजू सॅमसन तिथे आला. त्याला पिचवर येऊन बॉल कलेक्ट करताना पाहून मॅक्रो जॅनसन नाराज झाला आणि त्याने याबाबत तक्रार सुद्धा केली. मात्र त्यानेच चेंडू पकडण्यात अडथळा आणला होता, ज्यामुळे सॅमसन नाराज झाला होता. सॅमसनने याबाबत मॅक्रो जॅनसनकडे तक्रार केली हे पाहून कर्णधार सूर्या तिथे धावून आला आणि यावेळी सूर्या जॅनसनमध्ये भांडण झाले.

सूर्यकुमार आणि मॅक्रो जॅनसन यांच्यात सुरु असलेला वाद पाहून फिल्डवरील अंपायर त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी दोघांना एकमेकांपासून दूर केले. यावेळी सूर्यकुमार सॅमसनची बाजू घेऊन अंपायरशी बोलला. अखेर 15 व्या ओव्हरला रवी बिष्णोईने मॅक्रो जॅनसनला आउट केले. तो 8 बॉलमध्ये 12 धावा करून बाद झाला.


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने भारतासाठी धमाकेदार खेळी केली. त्याने 50 चेंडूत 107 धावांची खेळी खेळली. सॅमसनने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 214 होता. यासह टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी केली. तिलक वर्माने 18 चेंडूत 33 तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 17 चेंडूत 21 धावा केल्या. एवढंच नाही तर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. आवेश खानला 2 विकेट्सकचे घेण्यात यश आले. तर अर्शदीप सिंगने एक विकेट आपल्या नावावर केली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 203 धावा करण्याचे आव्हान दिले होते मात्र आफ्रिका केवळ 141 धावाच करू शकली. त्यामुळे भारताचा 61 धावांनी विजय झाला.

हेही वाचा :

50 जागांवर लढून तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार? अजित पवार हसतच समजावली आकडेमोड

पुन्हा सुरु होणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा

तर मग विकास निधी गेला कुठे? मुरला कुठे?