सुषमा अंधारेंचं राज्य सरकारला खुले चॅलेंज, लाडक्या बहिणीची काळजी असेल तर…

राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सरकारने(government) काढलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोधी पक्षांकडून विरोध होत असताना शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सरकारला चॅलेंज केले आहे. सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारूची दुकाने बंद करा असे आव्हान शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पंधराशे रुपयांची महिलांना गरज का पडते? , मालक धडधाकट कमवतो , पण येताना पावशेरी मारतो .. आकडे खेळतो.. त्याच्यातच चालली कमाई सगळी .. जर एवढी काळजी असेल शिंदे फडणवीस अजित पवार यांना , या बहिणीच कल्याण व्हावं तर दारूचे धंदे बंद करावे असं सुषमा अंधारे म्हणाल्या . दारूचे धंदे बंद झाले तर माय मावल्या पंधराशे मागणार नाही, महीला सुखी होतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या .

लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली, ज्या माणसाने एक महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला , त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली . एवढी बहिणींची काळजी असेल तर बहिणीला पंधराशे नको दाजीला नोकरी द्या, दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सरकारच्या(government) लाडक्या बहिण योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात देखील महिला सगळं घर चालवतात. 1500 देऊन अपमान का करता त्यांना 10 हजार रुपये द्या, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांना 1500 रुपये मिळतात. महागाईच्या काळात सगळं घर महिला चालवतात, त्यांना 1500 नाही तर 10 हजार रुपये द्या. महागाई, सिलेंडरचे वाढलेलले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे. पदवीधरांना आठ हजार, 12 वी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला 1500 हा अपमान कशाला करता? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

हेही वाचा :

मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार?

देश आज कमळाच्या चक्रव्ह्युव्हात अडकला आहे; राहुल गांधींनी तोफ डागली

विधानसभेपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, अजित पवारांनी गेम केला; शिवसेनेचा विश्वासू नेताच फोडला