पुणे: पुण्याजवळील चाकण येथे एका 27 वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून (affair)टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन तरूणाने आत्महत्या केली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती असं या तरुणाचं नाव आहे, त्याचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीमध्ये आढळला आहे.
सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवलेला होता. याच व्हिडिओद्वारे आणि लोकेशनच्या माध्यमातून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन तो बाहेर काढला आहे.
याा प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत प्रजापती या तरुणाचे चाकणमधील तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याला आपल्या प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण(affair) असल्याचा संशय होता. याच संशयाच्या नैराश्यात असलेला सूर्यकांतने 9 ऑक्टोबर आपले घर सोडले. त्यानंतर तो घरी आला नाही. सुर्यकांत दुसऱ्या दिवशी देखील घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली, चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला..
9 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेला होता, व त्याने थेट लोणावळा गाठले, पोलिसांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून शोध घेतला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे वाघजाई दरी परिसर आढळून आले होते, त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू असताना सूर्यकांत प्रजापती याचा मृतदेह हा लोणावळा शहर पोलीस खोपोलीतील अपघातग्रस्तांची संस्था तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमला सापडला.
या शोध मोहीमेदरम्यान या मुलाचे नातेवाईक, लोणावळा पोलीस, अपघातग्रस्त मदतीची संस्था आणि शिवदुर्ग रेस्कु टीमचे सदस्य हजर होते. मात्र प्रेमात नैराश्य आल्याने या तरुणाने चाकण वरून येऊन लोणावळ्यात आत्महत्या केली. परंतु प्रेम भंग झाल्याने नैराश्यपोटी तरुणाने इतकं टोकाचं पाऊल उचलणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतो.
सूर्यकांतला शोधण्याचं मोठं आव्हान होतं. लोणावळा शिवदुर्ग पथक देखील यावरून लोकेशनची पाहणी करत होतं. अखेर तो व्हिडिओ राजमाची येथील असल्याचं समोर आलं. तरूणाने आत्महत्येपुर्वी पाठवलेल्या त्या व्हिडीओमध्ये त्याच्या पाठीमागे दिसत असलेला भाग तिथला असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर काल (बुधवारी) सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. दरीत काही फुटांवर सूर्यकांतचा मोबाईल आढळून आला. आणखी खाली गेल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी आली.
मृतदेह त्याचा असल्याचं निश्चित झालं. राजमाची दरीत तब्बल 370 फुटांवर तरूणाचा मृतदेह आढळून आला. सात दिवसांनंतर सूर्यकांतचा शोध लागला. प्रेम प्रकरणातून सूर्यकांतने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. शिवदुर्गचे सुनील गायकवाड यांच्या पथकाने त्याचा मृतदेह शोधला.
हेही वाचा:
राधिका आपटे लवकरच होणार आई, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप!
सोन्याची जोरदार आघाडी, 10 ग्रॅमसाठी आता मोजा ‘इतके’ रुपये
यूपीआय पेमेंट सर्व्हिस लवकरच 50 नवीन ॲप्सवर मिळणार; एनपीसीआयकडून मोठी घोषणा!