कोल्हापुरात तरुणीचा संशयास्पद मृत्यू अंगावर मारहाणीच्या खुणा

कोल्हापूर प्रतिनिधी : घातपात झाल्याचा संशय(woman). कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या वैष्णवी पवार वय 24 या तरुणीचा गुरुवारी दुपारी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे मारहाणीत तिचा मृत्यू झाला असावा असा डॉक्टरांना व पोलिसांना संशय आहे. लक्ष्मीपुरी पोलीस यादृष्टीने तपास करीत आहेत.

शनिवार पेठ पोस्ट ऑफिस(woman) परिसरात राहणारी वैष्णवी पोवार ही एका खाजगी बँकेत नोकरीला होती. गुरुवारी सकाळी तिची प्रकृती बिघडल्यामुळे आई व भावाने तिला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. यावेळी तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

डॉक्टरांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी याबाबत विचारणा करण्यासाठी वैष्णवीची आई आणि भावाला ताब्यात घेतले आहे.पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. वैष्णवीला बुधवारी रात्री मारहाण झाली होती का किंवा तिच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा ह्या कशामुळे झाल्या आहेत याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

‘वंचित’ कडून मतविभाजनाचे डावपेच सुरू; मुस्लीम उमेदवाराला संधी

रुग्णालयातील उपचारादरम्यान कमी पडले पैसे? या बँकेने काढला मार्ग

लग्नाच्या एका महिन्यातच नवऱ्याच्या ‘या’ सवयीमुळे दु:खी नवी नवरी, 1 तास बाथरूममध्ये..