2024 वर्ष स्वप्नील साठी अनेक गोष्टी साठी खास ठरलं मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट. अभिनेता(actor) आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका चोखपणे साकारून स्वप्नील अनेक प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसला आहे. वर्ष संपताना स्वप्नीलची अजून एक स्वप्नपूर्ती पूर्ण झाली असून, अभिनेत्याच्या आयुष्यात ‘तिची’ एंट्री झाली आहे. म्हणजेच अभिनेत्याने एक आलिशान गाडी खरेदी केली आहे.
स्वप्नीलने(actor) नवी कोरी रेंज रोव्हर डिफेंडर घेतली असून पुन्हा हे वर्ष खास आणि त्याच्यासाठी आनंदाचे ठरणार आहे. त्याने सोशल मीडिया वर खास पोस्ट करून नव्या गाडी बद्दल खास गोष्ट लिहिली आहे. डिअर जिंदगी अस म्हणत आयुष्याला समर्पित एक छान पत्र लिहून त्याने त्याचा भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वप्नील ही पोस्ट शेअर करताना दिलेले की, “डिअर जिंदगी- आजचा दिवस नक्कीच खास आहे आणि तितकाच अभिमानास्पद देखील आहे. बाबांना आमच्या नवीन रेंज रोव्हर डिफेंडरची चावी घेताना बघणं हा एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे. डिफेंडर ही एक फक्त एक गाडी नाहीये ही आम्ही गाठलेल्या प्रत्येक अडचणीचे, आम्ही बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं.
ही फक्त सुरुवात आहे माहित आहे की या प्रवासात उतार-चढाव आले आहेत पण जिद्दीने पार करून अजून गोष्टी करण्याची ऊर्मी यातून मिळतेय”. असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेत्याच्या आयुष्यातील ही नवी गाडी पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. आणि त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
स्वप्नील कायम चर्चेत असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि अश्यातच पुन्हा एकदा स्वप्नील ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं काही दिवसापूर्वी स्वप्नीलने निर्माता म्हणून अजून एका चित्रपटाची घोषणा केली असून “सुशीला- सुजीत” हा नवा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आगामी “सुशीला सुजीत” या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करणार आहे. स्वप्नीलच्या सोबतीने अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मराठीमधील बडे कलाकार या चित्रपटासाठी निर्माते झाले असून आता या चित्रपटाची स्टार कास्ट काय असणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
ब्लॉकबस्टर चित्रपट, सातत्यपूर्ण काम आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार निर्माता – अभिनेता स्वप्नील येणाऱ्या वर्षात देखील खूप चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे. जिलबी, सुशीला- सुजीत सोबत अनेक चित्रपटात स्वप्नील दिसणार असून प्रेक्षक त्यांच्या प्रोजेक्ट्स साठी उत्सुक आहेत.
हेही वाचा :
महायुतीच्या शपथविधीसाठी उद्धव-राज ठाकरेंसह शरद पवारांनाही आमंत्रण
नको काँग्रेस, नको राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा?
‘तू तिथे कशाला…’, रोहित शर्माने यशस्वीला Adelaide विमानतळावरच झापलं; Video Viral