जांभूळ हे भारतात आणि आग्नेय आशियात आढळणारे एक लोकप्रिय फळ(fruit) आहे. हे त्याच्या आंबट-गोड चवीसाठी ओळखले जाते. चांदोली राष्ट्रीय उद्यान व शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील डोंगरकपारीत हे मोठ्या प्रमाणत आढळून येते. सध्या ‘डोंगरचा रानमेवा’ म्हणून जांभळाची विक्री ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धनगर समाजातील लोकांचे जांभूळ हे एक उदरनिर्वाहाचे साधन आहे.
त्याची आंबट-गोड चव सर्वांना मोहित करत असली तरी त्याचे अनेक औषधी (Medicinal Fruit) गुणधर्मही आहेत. हे झाड ग्रामीण व शहरी भागात अगदी रस्त्याकडेला, गावात अथवा शेताच्या बांधावर आढळून येते. जांभळाचे झाड हे एक मध्यम आकाराचे सदाहरित झाड आहे, जे १० ते २० मीटर उंच वाढू शकते. त्याची पाने लांबट, अंडाकृती आणि चकचकीत हिरवी असतात. फुले लहान, पांढरी किंवा हिरवी असतात आणि गुच्छांमध्ये येतात. फळे गोल, जांभळी किंवा गडद लाल रंगाची असतात आणि त्यांच्यात एकच बीज असते.
जांभळाचे फायदे
मधुमेह नियंत्रण : जांभळातील अँथोसायनिन नावाचे रसायन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. पचन सुधारणे: जांभळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. रक्तातील लोह वाढवणे: जांभळात लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे रक्तातील लोहाची पातळी वाढवण्यास मदत करते आणि अॅनिमिया टाळण्यास मदत करते.
हेही वाचा :
भिवंडीत भाजप उमेदवाराचा बोगस मतदानाचा आरोप; म्हणाले….
आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये विराट कोहलीचं ‘मिशन 266’!
चांगला मान्सूनचा अंदाज असूनही कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत?