तहवूर राणाचे प्रत्यार्पण भारताचे राजनैतिक यश

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशावर झालेला सर्वात मोठा भीषण दहशतवादी हल्ला(Terrorist attack) म्हणून मुंबईत झालेल्या 26 /11 च्या हल्ल्याकडे पाहिले जाते. तेव्हा संपूर्ण जग हा धरून गेले होते. कारण अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 9/ 11 च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देणारा तो हल्ला होता. या हल्ल्याचे काही मास्टरमाईंड पाकिस्तानमध्ये जसे आहेत तसेच मास्टरमाइंड अमेरिकेच्या तुरुंगात होते आणि आहेत. त्यातील तहवूर राणा याच्या अमेरिकेत मुसक्या बांधून गुरुवारी त्याला भारतात आणले गेले. भारताचे हे राजनैतिक यश मानले पाहिजे. दोन देशांमधील कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर या विषयाकडे राजकारण विरहित दृष्टीने पाहिले जाणे आवश्यक असताना काही जणांच्याकडून हा राजकीय मुद्दा ठरवला जात आहे.

हाफिज सईद सारखे दहशतवाद्यांचे(Terrorist attack) म्होरके आजही पाकिस्तानात सुखनैव नांदताना दिसत आहेत. भारताच्या मागणीवरून 26/ 11 च्या मास्टर माईंड विरुद्ध पाकिस्तानात चालवला गेलेला खटला म्हणजे एक नौटंकी होती. 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्याची टाकसा काही एकच संबंध नाही असे भासवण्याचा तेथील आयएएस संघटनेचा प्रयत्न जगाच्या पातळीवर फसलेला आहे.

26/ 11 च्या हल्ल्यापूर्वी डेव्हिड हेडली हा मुंबईत काही दिवस मुक्कामाला होता. या मुक्कामात त्याने हल्ला कोठे करावयाचा याची रेकी केली होती. सर्व प्रकारचे नकाशे त्याने दहशतवादी संघटनांच्याकडे पोहोचवले होते. हे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेने त्याला मोस्ट वॉन्टेड म्हणून अटक केली होती. आजही तो अमेरिकेच्या तुरुंगात आहे. डेव्हिड हेडली याच्याशी संबंध असणारा तहवूर राणा हा सुद्धा मुंबईच्या दहशतवादी(Terrorist attack) हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. त्याला भारताच्या स्वाधीन करावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून भारताकडून राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू होते.

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेल्यानंतर त्यांनी दहशतवादी राणाला भारताच्या ताब्यात देण्यात येईल अशी घोषणा केली होती. सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दहशतवादी राणाला भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतीय तपासायंत्रणामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक अमेरिकेला गेले होते. गुरुवारी दुपारी राणाला घेऊन हे पथक भारतात परतले.

तहवूर राणा याला अतिशय कडेकोट बंदोबस्तात इथे आणले गेल्यानंतर मुंबईवर झालेल्या 26/ 11 च्या हल्ल्यातील जखमा पुन्हा उघड्या झाल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचे प्राण गेले त्यांच्या नातेवाईकांच्याकडून आणि या हल्ल्यात अपंगत्व आलेल्यांच्याकडून तहवूर राणा याच्यावरील खटला जलद गती न्यायालयात चालवावा आणि त्याला फासावर लटकवावे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दुसऱ्या महायुद्धाचे गुन्हेगार असलेल्या प्रत्येक नाझीला ते जेथे असतील तेथून पकडून आणून त्यांना आंतरराष्ट्रीय हेग न्यायालयात हजर करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी इजराइल हे अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. अगदी त्याचप्रमाणे 26 /11 च्या हल्ल्यातील प्रत्येक गुन्हेगाराला पकडून भारताचा आणण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राणा याच्या प्रत्यार्पणाकडे पाहिले पाहिजे.

मुंबईवरील 26 /11 च्या हल्ल्यामध्ये राणा किंवा डेव्हिड हेडली हे प्रत्यक्ष सहभागी नव्हते मात्र त्यांनी या हल्ल्याची सूत्रे सांभाळली होती. मुंबईवर होत असलेला हा हल्ला हे मास्टरमाईंड भारताच्या बाहेर राहून दूरदर्शनवर आनंदाने पाहत होते.
मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार तुकाराम ओंबाळे यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन अजमल कसाब या दहशतवाद्याला(Terrorist attack) जिवंत पकडले नसते तर, तपासच खुंटला असता. कारण या हल्ल्यातील ज्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले त्या सर्वांच्या आयडी या हिंदू या नावाने केल्या गेल्या होत्या. हा हल्ला हिंदूंनीच केला आहे असा बनाव तयार करण्याचा मास्टर माईंड असलेल्यांचा कुटील डाव होता. तुकाराम ओंबाळे यांच्यामुळे हा डाव उधळला गेला.

राणा हा 26 /11 चा मास्टर माईंड आहे. त्याने या हल्ल्याची कशी तयारी केली होती, त्याच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक घटना कशी घडत केली? याचा तपास पूर्वीच झाला आहे. कटाचा सूत्रधार म्हणून त्याच्यावर खटला चालवला जाईल. आणखी एक विशेष म्हणजे त्याच्याकडून या हल्ल्याच्या संदर्भातील आणखी काही नवीन माहिती तपास पथकाला उपलब्ध होईल. त्यातून आणखी कोणी मास्टरमाईंड पुढे येतील. भारत आणि अमेरिका यांच्यामधील प्रत्यार्पण करारात नेमके काय म्हटले आहे याचे तपशील आज तरी उपलब्ध नाहीत. पण राणा याला भारतीय प्रचलित कायद्याप्रमाणे शासन द्यावे याबद्दल दुमत असण्याचे कारण दिसत नाही.

हेही वाचा :

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; पुरवठा विभागाची मोठी कारवाई

निष्पापांच्या मृत्यूवर हसणारा हाच तो क्रूरकर्मा…

उन्हाळ्यात लोण्यासारखी वितळू लागेल चरबी, फक्त आहारात या पदार्थांचा समावेश करा; झपाट्याने वजन होईल कमी