नेटफ्लिक्स(Netflix) ही जगातील सर्वात मोठी सब्सक्रिप्शन स्ट्रीमिंग सर्विस आहे. Disney+ Hotstar, Amazon Prime Video आणि JioCinema सारख्या इतर स्ट्रीमिंग ॲप्सच्या तुलनेत नेटफ्लिक्सची सब्सक्रिप्शन फीस खूप जास्त आहे. नेटफ्लिक्सच्या लायब्ररीमध्ये विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट, टीव्ही शो, डॉक्युमेंट्री उपलब्ध आहेत.
नेटफ्लिक्स(Netflix) हा केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत तुमचे आवडते चित्रपट किंव वेब सिरीज पाहू शकता. विकेंड आणि नेटफ्लिक्स असं भन्नाट कॉम्बिनेशन आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत. नेटफ्लिक्सवर आपला आवडता चित्रपट किंवा वेब सिरीज पाहत असताना, अनेक वेळा असे घडते की आपल्याला एखाद्या विशिष्ट सीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा असतो.
आपण जेव्हा त्या सीनचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी अनेकदा स्क्रीन काळी किंवा रिकामी येते. Netflix च्या कॉपीराइट संरक्षणामुळे असं घडतं. नेटफ्लिक्सच्या कॉपीराइट संरक्षणामुळे तेथील स्क्रीनशॉट ब्लॉक केले जातात आणि युजर्सना त्यांनी कॅप्चर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये काळी किंवा रिकामी स्क्रीन दिसते. पण तुम्ही काही सोप्या पद्धतींनी तुमच्या आवडत्या नेटफ्लिक्स सीनचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
वेब ब्राउझरमध्ये एक्सटेंशन वापरा
तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर नेटफ्लिक्स पाहत असाल, तर तुम्ही Chrome आणि Firefox सारख्या ब्राउझरमध्ये काही एक्सटेंशन वापरू शकता. उदाहरणार्थ, ‘व्हिडिओ स्क्रीनशॉट’ सारखे एक्सटेंशन तुम्हाला व्हिडिओ दरम्यान सहजपणे स्क्रीनशॉट घेण्यासाठी मदत करू शकतात. यासाठी क्रोम वेब स्टोअरवर जाऊन एक्स्टेंशन इंस्टॉल करा आणि नेटफ्लिक्स व्हिडिओ प्ले करताना त्याचा वापर करा.
ऑपरेटिंग सिस्टम स्क्रीनशॉट मोड बदला
काही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनशॉट घेण्यासाठी खास मोड असतात. उदाहरणार्थ, तुम्ही Windows वर ‘Snipping Tool’ किंवा ‘Snip & Sketch’ ॲप वापरून कस्टम स्क्रीन कॅप्चर करू शकता. MacOS मध्ये, तुम्ही Shift + Command + 4 वापरून अचूक सीन कॅप्चर करू शकता.
थर्ड-पार्टी सॉफ्टवेयर वापरा
वरील पद्धती काम करत नसल्यास, तुम्ही OBS स्टुडिओ किंवा ShareX सारखे थर्ड-पार्टी स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर वापरू शकता. हे सॉफ्टवेअर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते आणि नंतर आपण व्हिडिओ प्ले करू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता.
स्मार्टफोनवरील स्क्रीनशॉट
तुम्ही मोबाईलवर नेटफ्लिक्स पाहत असाल तर, स्क्रीनशॉट घेणे थोडे अवघड असू शकते. यासाठी, प्रथम “Airplane Mode” चालू करा आणि वाय-फाय डिसेबल करा, नंतर स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करा. तथापि, ही पद्धत प्रत्येक वेळी कार्य करत नाही, परंतु काही वेळा उपयुक्त ठरू शकते.
हेही वाचा :
अबिटकरांची हॅट्रिक होणार? कि, के.पी.बाजी मारणार?
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट
हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट दिल्यानंतर 4 महिन्यानंतर नताशाने तोडलं मौन