दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस बारावीनंतरच्या पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना विविध दाखल्यांमुळे अडचणी येऊ नयेत (education), म्हणून प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कॅम्प घेतले जात आहेत.
बार्शी, माढा, उत्तर सोलापूर तालुक्यानंतर आता मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, सांगोला, मंद्रूप, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये देखील १५ जूनपूर्वी कॅम्प होणार आहेत. विशेष म्हणजे सर्व कॅम्प मंडल स्तरावर होणार आहेत.
जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावात (मंडल स्तरावर) विशेष कॅम्प राबवून शैक्षणिक दाखले देण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांसाठी ही सोय करून देण्यात आली आहे.
मोहोळ तालुक्यातील कॅम्प १४ व १५ जूनला होईल. तर अक्कलकोट तालुक्यातील कॅम्प ११ व १२ जूनला असणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील मंडलस्तरावर कॅम्प सुरू झाले असून, पुढील आठ दिवस ही मोहीम सुरू राहील, असे तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले. शैक्षणिक दाखला नसल्याने प्रवेश मिळाला नाही, अशी एकाही विद्यार्थ्यांची तक्रार येऊ नये, यासाठी हे कॅम्प राबविले जात आहेत.
हेही वाचा :
उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकचा वृद्धाला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
Icc T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी पहिली टीम फिक्स
मोठी बातमी! चीनकडून सोनं खरेदीला ब्रेक; सोन्याच्या , दरांवर परिणाम