तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच घेणार सप्तपदी…

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना(Entertainment News) भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत असतात. दोघं सतत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये स्पॉट होतात. आता ते त्यांच्या नात्याला नाव देणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, 2025 मध्ये ते लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यासाठी ते त्यांच्या स्वप्नाच्या घराच्या शोधात आहेत.

तमन्ना भाटिया (Entertainment News)आणि विजय वर्मा हे पुढच्या वर्षी लग्न करणार असून त्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. 123 तेलगू रिपोर्ट्सनुसार, दोघांनी कथितपणे 2025 मध्ये सप्तपदी घेणार आहेत. लग्नानंतर राहण्यासाठी दोघं आलिशान अपार्टमेंटच्या शोधात आहेत. खरंतर, आतापर्यंत त्या दोघांनी अधिकृतपणे याची घोषणा केली नाही आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मानं कथितपणे डिसेंबर 2022 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. सुरुवातीला दोघांनी त्यांच्या नात्याविषयी काही सांगितलं नाही. पण तमन्नानं अखेर जून 2023 मध्ये एका मुलाखतीत विजय वर्मासोबत रिलेशनशिपला अधिकृत केलं. तिनं सांगितलं की विजय तिची हॅपी प्लेस आहे. त्याशिवाय तिनं हे देखील सांगितलं की विजयनं कोणताही अ‍ॅटिट्यूड न ठेवता तिला अप्रोच केलं आणि तिला त्याच्यातली हिच गोष्ट जास्त आवडली.

दरम्यान, विजयनं मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की त्यानं नातं खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्यात खूप प्रेम आहे. ते दोघं त्यांच्या नात्याचा आनंद घेतात. महत्त्वाचं म्हणजे माझ्या लव्ह लाइफमध्ये लोकांना किती इंटरेस्ट आहे, हे पाहून मला धक्का बसला. पण आता मला या सगळ्याची सवय झाली आहे. तर विजय आणि तमन्नाची लव्ह स्टोरी ही ‘लस्ट स्टोरी 2’ च्या सेटवर सुरु झाली. त्या सेटवर आधी मैत्री झाली आणि त्यानंतर जेव्हा शूटिंग संपलं त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. खरंतर शूटिंग संपल्यानंतर विजयनं तमन्नासोबत डेटवर येणार का असं विचारलं आणि हळू-हळू दोघं जवळ आले.

हेही वाचा :

महाविकास आघाडीला महाराष्ट्राने नाकारले

Run Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं….. Video Viral

निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा