लहान असो वा मोठे केक हा पदार्थ सर्वांनाच फार आवडतो. आता (christmas)ख्रिसमस हा सण आता जवळ आला आहे. डिसेंबर महिना म्हटला की, ख्रिसमस सणाची सर्वांना आठवण येऊ लागते. या सणानिमित्त केक हा आवर्जून बनवला किंवा खाल्ला जातो. आता बरेचजण हा केक बाजारातून विकत आणत असतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या ख्रिसमसला तुम्ही चवदार पण तितकाच पौष्टिक असा केक घरीच तयार करू शकता. हा केक फार कमी वेळेत, तसेच मोजक्या साहित्यात बनून तयार होतो.
तुम्हीही ख्रिसमस सणानिमित्त काही खास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरी ख्रिसमस स्पेशल केक बनवण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा प्रियजनांसह या केकचा आनंद लुटू शकता. नाचणीच्या केकची ही हटके रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ही रेसिपी फार सोपी आहे. नाचणी, खजूर आणि अक्रोडचा वापर करून हा केक तयार केला जाणार आहे. चला तर मग आता या केकसाठी लागणारे(christmas) आवश्यक साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
साहित्य
- 12 खजूर (220 ग्रॅम)
- 1 + 1/2 कप गरम दूध (375 ग्रॅम)
- 1/2 कप वितळलेले बटर (95ग्रॅम)
- 1/2 कप नाचणीचे पीठ (60 ग्रॅम)
- 1/2 कप गव्हाचे पीठ (60 ग्रॅम)
- 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
- 1 चमचा बेकिंग सोडा
- 1/2 कप अक्रोड (चिरलेला) 50 ग्रॅम
कृती
- नाचणीचा केक तयार करण्यासाठी सर्वप्रथम गरम दुधात खजूर 20 मिनिटे भिजवून ठेवा, असे केल्याने खजूर दुधात छान मऊ होतील
- खजूर मऊ झाल्यानंतर यांना मिक्सरच्या भांड्यात घाला आणि याची पेस्ट करा
- ही टायर खजुराची पेस्ट एका वाडग्यात काढून घ्या
- आता यात वितळलेले बटर बटार घाला आणि मिक्स करा
- यानंतर यात नंतर हे मिश्रण एका भांड्यात घ्या आणि त्यात मैदा (नाचणी आणि गव्हाचे पीठ) बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घाला. मिश्रण चांगले फेटून घ्या
- आता एका बेकिंग ट्रे किंवा कोणत्याही एका भांड्यात हे मिश्रण टाका आणि समान पसरवा
- यावर बारीक अक्रोडनेचे तुकडे टाका आणि पसरवा
- आता हे केक 80 डिग्री सेल्सियसला 50(christmas) मिनिटे बेक करा
- अशाप्रकारे तुमचा हेल्दी आणि टेस्टी असा नाचणीचा केक तयार होईल
- केकची ही रेसिपी नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे
हेही वाचा :
IPL झालं आता WPL 2025 लिलावाचा थरार रंगणार..
गाडीला धक्का देत होता तेवढ्यात ट्रॅक्टरखाली आला ड्रायव्हर, आधी चिरडला अन् मग… Video
भारताला मोठा झटका; स्वित्झर्लंडने काढून घेतला ‘Most Favoured Nation’ चा दर्जा