टाटा समूह 5 लाख नोकऱ्या देणार; ‘या’ क्षेत्रामध्ये उपलब्ध होणार सर्वाधिक नोकऱ्या!

भारतातील सर्वात मोठ्या खासगी उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने(Tata group) आपली 5 वर्षांची रणनीती निश्चित केली आहे. या अंतर्गत टाटा समूह उत्पादन क्षेत्रात सुमारे 5 लाख रोजगार निर्माण करणार आहे. देशातील उत्पादन क्षेत्र 7.4 टक्के वेगाने वाढत आहे. यामध्ये सुमारे 13 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. याअंतर्गत टाटा समूहाने सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि संबंधित उद्योगांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे.

मंगळवारी (ता.१५) इंडियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन बोलत होते. भारत सध्या विकसित देश बनण्याचे स्वप्न पाहत आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यात उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण केल्याशिवाय आपण विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. दर महिन्याला सुमारे 10 लाख लोक भारताच्या कार्यबलाचा भाग बनतात. त्यामुळे देशाच्या भविष्यासाठी अधिकाधिक नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

टाटा समूहाने(Tata group) सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय संबंधित इतर क्षेत्रातही टाटा समुह आपली गुंतवणूक वाढवणार आहे. येत्या ५ वर्षात ५ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे समुहाचे लक्ष्य आहे. टाटा समूहाने आसाममध्ये मोठा सेमीकंडक्टर प्लांट उभारला आहे. याशिवाय ईव्ही आणि बॅटरी उत्पादनातही समुह काम करत आहे. सध्या पुढील ५ वर्षांच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. टाटा समुह सध्या अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करण्यावर भर देत आहोत. याशिवाय, उत्पादन क्षेत्रातही सुमारे 5 लाख एसएमई निर्माण होतील. असेही ते यावेळी म्हणाले आहे.

देशाला 10 कोटी रोजगार निर्माण करायचे आहेत. जर आपण 5 लाख प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या तर त्यांच्या मदतीने कितीतरी पट अधिक अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन (एनएसओ) च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये उत्पादन क्षेत्रात 11 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. ज्या आर्थिक वर्ष 2023 मध्ये वाढून 13 लाख झाल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य महाराष्ट्र हे पहिल्या स्थानी आहे. यानंतर गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा:

अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचाच राजीनामा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 निकाल

1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची शक्यता