टाटा मोटर्स नवीन नेक्सॉन ईव्ही(EV cars) आणि कर्व्ह ईव्ही कार खरेदीवर मोफत चार्जिंगचा फायदा देत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान वर उल्लेख केलेल्या एसयूव्हीपैकी एक खरेदी केली तर तुम्ही फायदे मिळवू शकता. ही ऑफर नवीन ग्राहकांसाठी पैश्याची बचत करणारी ठरणार आहे.
या ऑफर अंतर्गत, नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही(EV cars) आणि टाटा कर्व्ह ईव्ही खरेदी करणारे त्यांचे वाहन १००० युनिट्स अथवा वाहन खरेदी केल्यानंतर 6 महिने मोफत चार्जिंग करु शकतात. ही ऑफर देशभरातील टाटा पॉवर ईझेडच्या चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध आहे. या स्टेशनची संख्या 5500 पेक्षा जास्त आहे.
ग्राहकांना त्यांचे वाहन टाटा पॉवर ईझेड चार्जच्या फोन अॅपवर नोंदणीकृत करावे लागेल. वापरकर्त्यांनी हे देखील लक्षात ठेवावे की ही वाहने खाजगी मालकीची असावीत.नेक्सॉन ईव्ही आणि कर्व्ह ईव्हीची विक्री वाढवण्यासाठी ही मोफत चार्जिंग सेवा देण्यात आली आहे.
Tata Nexon ईव्ही स्पेसिफिकेशन:
टाटाची लोकप्रिय इलेक्ट्रीक व्हेइकल असलेली नेक्सॉन ईव्ही ही दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – एमआर (मीडियम रेंज) आणि एलआर ( लॉंग रेंज). या कारच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास एमआरमध्ये 30 किलोवॅट प्रति तास आणि एलआर मध्ये 40.5 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहेत. या बॅटरीमुळे कारची एमआर व्हेरिएंट ही 325 किमीची रेंज देते, तर एलआर व्हेरिएंट ही तब्बल 465 किमीची रेंज देते. या कारसोबत ७.२ किलोवॅट एसी चार्जर प्रदान केला आहे.
Tata Curvv ईव्ही स्पेसिफिकेशन:
Tata Curvv ईव्ही ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आहे – ४५ किलोवॅट प्रति तास आणि ५५ किलोवॅट प्रति तास – अनुक्रमे ५०२ किमी आणि ५८५ किमी ची रेंज देते. टाटा मोटर्सचा दावा आहे की जलद चार्जिंग वापरून बॅटरी फक्त १५ मिनिटांत १५० किमी पर्यंत चार्ज करता येते. Curvv आणि Nexon दोन्ही कारच्या बॅटरी रेंज या जबरदस्त आहेत. Curvv ची रेंज तर 500 किलोमीटरच्याही पुढे आहे. त्यामुळे या दोन्ही कार भारतीय ग्राहकांना आकर्षित करत आहे.
Nexon EV किंमत ही 12.49 लाख रुपये आणि Curvv EV ची किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरू होते.कारवरील सवलतीचा विचार केल्यास Nexon EV (MY2023) वर 2 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते तर Curvv EV वर कोणतीही सवलत मिळत नाही.
मागील तीमाहीत ही या दोन्ही कारची विक्री ही चांगली झाली होती. त्यामुळे आता या ऑफरमुळे विक्रीत वाढ होऊ शकते.
हेही वाचा :
‘कल हो ना हो’च्या छोटी जियाने केले लग्न; बॉयफ्रेंड स्वप्नीलसह अडकली लग्नबंधनात!
करिश्माने हनीमूनच्या रात्री झालेला शारीरिक त्रासाबद्दल केला गौप्यस्फोट!
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार नुकसान भरपाई