मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत शेअर बाजारात(investors) पुन्हा एकदा दबाव दिसून येत आहेत. अमेरिकन रोखे उत्पन्नात वाढ, विदेशी गुंतवणूकदारांची माघार, आणि लोकसभा निवडणुकीबाबत जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांचीमध्ये घबराट पसरल्यामुळे गेल्या काही दिवसात बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळाले, पण यादरम्यान टाटा ग्रुपच्या एका कंपनीचा स्टॉक मात्र सातत्याने तेजीच्या वाटेवर अग्रेसर असून ब्रोकरेजही उत्साही दिसत आहेत.
शेअर मार्केटमधील(investors) अलीकडच्या चढ-उतारांदरम्यान देशातील मोठ्या औद्योगिक कंपन्यांपैकी एक टाटा ग्रुप कंपनीच्या इंडियन हॉटेल्सचे शेअर ब्रोकरेजच्या रडारवर आले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये मध्यम मुदतीत कमाई वाढीला चालना मिळण्याचा आत्मविश्वास कायम राहिला. तर अहवालानंतर, ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज इंडियन हॉटेल्स (IHCL) वर उत्साही असून सुमारे २१% लक्ष्य सुधारित केले आहे. तर या वर्षी आतापर्यंत शेअरने सुमारे ३० टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने इंडियन हॉटेल्सवर खरेदीचा सल्ला दिला आणि प्रति शेअर लक्ष्य किंमत ६१७ रुपयांवरून ६४० रुपये केली जी सध्याच्या किमतीवरून सुमारे २१% अधिक आहे. ५ जून २०२४ रोजी शेअर ५२९ रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे शेअरमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे २० ते २१% मजबूत तेजी ब्रोकरेजला अपेक्षित आहे.
गुंतवणूकदारांना नेहमी मल्टिबॅगर परतावा देणारा इंडियन हॉटेल्स दीर्घकाळासाठी बहुगुणी ठरला असून मागील पाच वर्षात कंपनीने २९०%, तीन वर्षात ३३०% आणि दोन वर्षात १४५ टक्क्यांचा शानदार परतावा दिला असून गेल्या एका वर्षातही स्टॉकने गुंतवणूकदारांची निराशा केली नाही आणि भागधारकांना सुमारे ५० टक्क्यांचा नफा दिला.
ब्रोकरेज हाऊसने म्हटलेक, हॉटेल उद्योगातील तेजीचा फायदा इंडियन हॉटेल्सला (IHCL) झाला तसेच, कंपनीचा ब्रँड देशभरात मजबूत वाढला असून इंडियन हॉटेल्सने आर्थिक वर्षाच्या (FY24) वार्षिक अहवालात माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२४ (FY24) मध्ये महसूल वाढ १६.५% होती तर एबिटा वाढ १९.५% राहिली. याशिवाय नवे आर्थिक वर्ष २०२५ (FY25) मध्ये देखील मजबूत वाढीची अपेक्षा आहे.
या कालावधीत विद्यमान मालमत्तेमधून वार्षिक EBITDA ८ ते १०% वाढीची शक्यता असून नवीन हॉटेल्स सुरू झाल्यावर हे प्रमाण वाढेल. मजबूत दृष्टीकोन पाहता ब्रोकरेजने इंडियन हॉटेल्सचे रेटिंग होल्ड वरून BUY वर श्रेणीसुधारित केले.
हेही वाचा :
यंदा पण लसण खिसा कापणार; किंमत झाली दुप्पट
निवडणुकीत असे कसे घडले? महायुतीचे नेते विचारात पडले
कारखानदारांसह सरकारला हादरे देणाऱ्या राजू शेट्टींचं नेमकं चुकलं कुठं?