डॉक्टरांनी मृत घोषित केलेले तात्या जिवंत झाले; हरिनामाच्या जोरावर कोल्हापुरात चमत्कार!

ही बातमी मृत्यूच्या दारातून परतलेल्या एका व्यक्तीची आहे. कोल्हापुरातील पांडुरंग तात्या चक्क(dead)मृत्यूच्या दारातून घरी परतले आहे. 15 दिवसांपूर्वी हरीनामाचा जप करताना त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यावेशी त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले पण कोणतीच हालचाल न झाल्याने त्यांना (dead)मृत घोषित करण्यात आलं. अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना घरी आणताना त्यांच्या शरिरात हालचाल जाणवली त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आलेत. उपचारानंतर पांडुरंग तात्या चक्क चालत घरी परतलेय त्यामुळे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

कोल्हापुरातील पांडुरंग तात्या वारकरी यांना हरी नामाचा जप करत असताना पंधरा दिवसांपूर्वी तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले पण कोणतीच हालचाल न झाल्याने पांडुरंग तात्या वारकरी यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.

त्यानंतर पांडुरंग तात्या यांना ॲम्बुलन्स मधून परत नेत असताना अचानक त्यांची पून्हा हालचाल सुरू झाली, त्यामुळे तातडीने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पांडुरंग तात्यांच्यावर पुन्हा उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पांडुरंग तात्या पांडुरंगाच्या कृपेने पुन्हा घरी परतल्याची कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

65 वर्षीय पांडुरंग तात्या हे हरीनामाचा जप करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला होता. कायम परमेश्वरांच्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले तात्या देवाच्या कृपेनेच बचावले असं कुटुंबिय सांगतात. 15 दिवसांनी व्यवस्थित उपचार घेऊन परतलेल्या पांडुरंग तात्यांचं कुटुंबियांनी घरी जोरदार स्वागत केलं.

हेही वाचा :

खळबळजनक ! महिलेवर लैंगिक अत्याचार; ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन्…

टीव्ही रिचार्ज दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; ‘फ्री टू एअर डीटीएच’ची मागणी वाढली!

नाराज भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही; प्रवेशाला ‘ब्रेक’ लागण्याचं कारणही समोर