“तौबा-तौबा” पडले महागात; दिव्यांशचे दात तुटता-तुटता वाचले

विकी कौशलचा नवा चित्रपट ‘बॅड न्यूज’ १९ तारखेला सर्वत्र प्रदर्शित(teeth) करण्यात आले. या चित्रपटातील तौबा तौबा नावाचे गाणे सध्या इंस्टाग्रामवर थैमान करत आहे. या गाण्याने तर भारतभर कहर केला आहे. या गाण्याला इतकी प्रसिद्धी मिळण्यामागचे सगळ्यात मोठे कारण विकी कौशलची डान्स स्टेप आहे. या गाण्यातील विकी कौशलचा डान्स खूप प्रसिद्धीस आला आहे.

इंस्टाग्रामवरील इन्फ्लुएन्सर्ससहित सिनेसृष्टीतील अनेक कलाकारदेखील(teeth) या गाण्यावर ठेका धरत आहेत. विकी कौशलच्या स्टेप्सला कॉपी करत आहेत. तर काही या स्टेप्सला अगदी विनोदी रूपात साकारत आहेत. प्रत्येकजण या स्टेप्सला ज्याच्या त्याच्या सोयीने करत आहेत. कुणी परफेक्ट करत आहेत तर कुणी स्टेप्सला बदलूनच पूर्ण बदलून स्वतःच्या पद्धतीने काही नवीन बनवत आहेत.

ऍक्टर दिव्यांश द्विवेदीने देखील तौबा तौबावर रील बनवला आहे. पण विकी कौशलच्या डान्स स्टेपला सोपा करण्याच्या बदलात त्याने स्वतःचे हात पाय नक्की मोडून घेतले आहे. रीलमध्ये दिव्यांश तौबा तौबा गाण्याची स्टेप मारण्याअगोदर स्टेप मारण्यास सोपे पडावे म्ह्णून फरशीवर पाउडर टाकत आहे. पठ्ठ्या काही सेकंद बरोबर नाचला पण नंतर फरशीवर पसरवलेल्या पाउडरमुळे चांगलाच घसरून पडला आहे. आपण केलेल्या करामती आपल्याच अंगाशी कशा येतात, याचा उत्तम नमुना ऍक्टर दिव्यांश द्विवेदीने अगदी विनोदी स्वरूपात दिलेला आहे.

कॉमेंट्समध्ये अनेक नेटकऱ्यांनी सदर व्हिडिओवर प्रतिसाद दिलेला आहे. एका यूजर म्हणतो कि,”बिचार्याला काय अपेक्षा होती आणि काय झाले. तर दुसरा म्हणतो कि,”दादा, कदाचित तुम्ही वापरलेली पावडर एक्सपायर झाली असेल.” तर एकाने “मै गिऱ्या होया बंदा नीच बलिये” असे एका पंजाबी गाण्याचे बोलत लिहले आहेत.

हेही वाचा :

पावसाळ्यात वाढणारा अ‍ॅलर्जीचा धोका: काळजी घेण्याची गरज

पावसाचा परिणाम, भाजीपाला बाजारात दर नियंत्रणात

“जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडारात गुप्त बोगदा? पुरीच्या राजाची आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची मागणी”