देशातील प्रमुख राज्य असलेल्या महाराष्ट्र(maharashtra) आणि झारखंड या राज्यांमध्ये सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. असे असताना या दोन राज्यांमधील करदात्यांना निवडणुकीत मताधिकाराचा वापर करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडून जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) सोमवारी (ता.१८) महाराष्ट्र(maharashtra) आणि झारखंडच्या जीएसटी करदात्यांना दिलासा देण्याबाबत हा निर्णय घेतला आहे. बोर्डाने ऑक्टोबर महिन्यासाठी जीएसटीआर-3 बी भरण्याची आणि कर भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवून 21 नोव्हेंबर केली आहे. त्यामुळे याचा दोन्ही राज्यांतील करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर 2024 साठी जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या राज्यांच्या करदात्यांना निवडणुकीसाठी त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यासाठी वेळ देण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
“केंद्र सरकारने जीएसटी अंमलबजावणी समितीच्या (जीआयसी) मान्यतेने, नोंदणीकृत व्यक्तींसाठी फॉर्म जीएसटीआर-3 बी भरण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 2024 मधील 20.11.2024 वरून 21.11.2024 पर्यंत वाढवली आहे. 2024 पर्यंत या राज्यांमध्ये व्यवसाय करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा :
नवऱ्याकडून छळ झाला सांगताना भाजप उमेदवाराला रडू कोसळले?
कश्मीरा शाहचा लॉस एंजिल्समध्ये झाला गंभीर अपघात; कपड्यांचा फोटो शेअर करत म्हणाली…
रूपया खोटा निघाला…भरणेंना पाडायचं, पाडायचं, पाडायचं; शरद पवारांचं मोठं वक्तव्य