चहा की कॉफी? हिवाळ्यात आरोग्यासाठी कोणतं पेय ठरेल गुणकारी

राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडी(winter) वाढल्याने सगळीकडे वातावरणात बदल झाला आहे. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. थंडी वाढल्यानंतर सर्दी, खोकल्यासह साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. शिवाय या दिवसांमध्ये गरम आणि मसालेदार पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते.

हिवाळा(winter) चालू झाल्यानंतर सकाळी लवकर उठण्याची इच्छा होत नाही. सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. काहींना दुधाचा चहा आवडतो तर काही काळा चहा आवडतो. तर अनेक लोक दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. पण आरोग्यासाठी नेमकं चहा किंवा कॉफी प्रभावी आहे? असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल ना. मग जाणून घेऊया सविस्तर.

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम गरम चहा पिण्यास प्रथम प्राधान्य देतात. चहा प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. गरम चहा प्यायल्यामुळे शरीर आतून उबदार राहते, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये साधा चहा पिण्यावेजी आले, तुळस, काळी मिरी आणि लवंग घालून तयार केलेल्या चहाचे सेवन करावे.

ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मसाला चहाचे सेवन करावे. चहामध्ये आढळून येणाऱ्या घटकांमुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून नुकसान होत नाही. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मसाला चहा किंवा आल्याचा चहा प्यायल्यास सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांपासून बचाव होतो.

अनेक लोक सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. कॉफी प्यायल्याशिवाय शरीरात ऊर्जा निर्माण होत नाही. कॉफीमध्ये असेलेले कॅफिन शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते. तसेच हिवाळ्यात सतत येणारी झोप नियंत्रणात ठेवण्यासाठी कॉफीचे सेवन केले जाते.

थंडीच्या दिवसांमध्ये कॉफी प्यायल्यास शरीरातील चयापचय क्रिया वाढून शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. कॉफीच्या सेवांमुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर निरोगी राहण्यासाठी आहारात कॉफीचे सेवन करावे.

हिवाळ्यात चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. या दिवसांमध्ये थंड चहा पिण्याऐवजी गरम चहाचे सेवन करावे. हिवाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी मसाला चहाचे सेवन करावे. मसाला चहा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी आलेली झोप कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करावे. अशावेळी कॉफी आरोग्यासाठी प्रभावी ठरेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

हेही वाचा :

शरद पवार आणि अजित पवार कधीही एकत्र येतील…

मुख्यमंत्री कोण? अजितदादांचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा, १७८ आमदार पाठिशी

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार; कोण होणार पुढील CM?