सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम

सोशल मीडियावर मिनिटामिनिटाला काही असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे कळत नकळत चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणतात आणि विचार करालया भागही पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या अनेकांच्याच सोशल मीडिया Feed मध्ये येत आहे. झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ बिलासपूर जिल्ह्यातील मस्तुरी ब्लॉकच्या बरेली प्राथमिक शाळेतील(school) असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडीओ पाहताक्षणी लक्षात येत आहे, की यामध्ये वर्गात असणाऱ्या शिक्षिका एका खुर्चीवर बसल्या असून, समोर पाय ठेवण्यासाठी आणखी एक खुर्ची घेत निवांत निजल्या होत्या. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेल्या या शाळेतल्या (school)बाई/ शिक्षिका वर्गात मात्र विश्रांती घेत असून, विद्यार्थी त्यांचात्यांचाच अभ्यास करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तर देशाच्या भवितव्याविषयी चिंतेचाच सूर आळवला. कर्तव्य बजावत असताना शिक्षिकेचं हे वागणं किती अयोग्य आहे, याच विचारानं अनेकांनी संतप्त सूरही आळवला. जिथं गावखेड्यातील विद्यार्थी दूरवरचा प्रवास करत शिक्षणासाठी शाळेमध्ये येतात, उज्वल भवितव्याची स्वप्न पाहतात तिथंच प्रत्यक्षात त्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याचंच दाहक वास्तव हा व्हिडीओ दाखवत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ व्यवस्थित पाहिला असता लक्षात येत आहे की, एक व्यक्ती मोबाईलचा कॅमेरा सुरू करून वर्गात येतो त्याच क्षणी, ‘बाई शिकवतायत का…?’ या त्याच्या प्रश्नानंच शिक्षिकेला जाग येते. सकाळपासून आपलं डोकं दुखत असल्याचं सांगत शिक्षिका सारवासारव करत असतानाच तिचं लक्ष मोबाईलकडे जातं आणि एका क्षणात डोळे चमकतात. विद्यार्थ्यांना बाई शिकवतायक का? असं विचारलं असता, हो शिकवतेय… असं म्हणत या बाईंचं विद्यार्थ्यांकडे पाहत हसणं कैक प्रश्न उपस्थित करून जात आहे.

शिक्षण विभाग घडल्या प्रकरणी काही कारवाई करणार का? हे असंच सुरू राहिल्यास देश पुढं जाणारच कसा? असे एक ना अनेक प्रश्न हा व्हिडीओ पाहून नेटकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान यासंदर्भात शिक्षण विभागाकडून अद्यापही कोणतंच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

हेही वाचा :

महाराष्ट्रात खळबळ उडवणारी बातमी! ’25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील

दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात, बोर्डानं केला खुलासा

IND vs AUS ‘या’ दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण…