टी 20 सीरिजसाठी टीम जाहीर, 6 खेळाडूंचं कमबॅक, कॅप्टन कोण?

क्रिकेट(Cricket) विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. लिटन दास हा बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. लिटॉनने याआधीही बांगलादेशचं नेतृत्व केलं आहे. दासने 2021 च्या न्यूझीलंड दौऱ्यात महमुदुल्लाह याच्या अनुपस्थितीत नेतृत्व केलं होतं. तसेच या मालिकेतून बांग्लादेश टीममध्ये 6 खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. सौम्या सरकार,अफीफ हुसैन, शमीम हुसैन पटवारी, नसुम अहमद, हसन महमूद आणि रिपन मोंडोल यांचं कमबॅक झालं आहे.

शाकिब अल हसन आणि महमु्दुल्लाह हे 2 अनुभवी ऑलराउंडर्स टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. अशात आता बांग्लादेशला नव्याने संघाची बांधणी करायची आहे. नजमुल हुसैन शांतो याने बांगलादेशचं गेल्या टी 20i मालिकेत टीम इंडिया विरुद्ध नेतृत्व केलं होतं. मात्र आता त्याला ग्रोईन इंजरीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. आता कमबॅकनंतर शांतो पुन्हा नेतृत्व मिळवण्यात यशस्वी ठरतो का? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल, कारण त्याची टी 20 क्रिकेटमधील आकडेवारी. शांतोला टी 20i क्रिकेटमध्ये(Cricket) काही खास करता आलेलं नाही.

उभयसंघातील या टी 20i मालिकेला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 5 दिवसांतच ही मालिका आटोपणार आहे. मालिकेतील दुसरा सामना हा 18 तर तिसरा आणि अंतिम सामना 20 डिसेंबरला होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच स्टेडियममध्ये होणार आहेत. अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथे हे सामने खेळण्यात येणार आहेत.

पहिला सामना, सोमवार 16 डिसेंबर

दुसरा सामना, बुधवार 18 डिसेंबर

तिसरा सामना, शुक्रवार 20 डिसेंबर

विंडिज विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : लिटन दास (कॅप्टन), सौम्या सरकार, तांझीद हसन तमीम, परवेज हुसैन एमोन, अफीफ हुसैन, मेहदी हसन मिराज, झाकर अली अनिक, शमीम हुसैन पटवारी, शेख महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, तंजीम हसन साकिब, हसन महमूद आणि रिपन मोंडोल.

हेही वाचा :

2019 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा

“मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय दिल्लीतच ठरणार? फडणवीस, शिंदे आणि अजित पवार दिल्लीला रवाना”

एकनाथ शिंदेंकडे 13 मंत्रिपदे: फडणवीसांचा फोनवरून सहभाग