इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळालं स्थान

भारताचा(team India) संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध T२० मालिकेला सुरुवात करणार आहे. भारताच्या संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली या मालिकेमध्ये मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी (team India)टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद शामीला संघात स्थान मिळाले आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे आहे. शामी जवळपास २ वर्षांनंतर संघात पुनरागमन करत आहे. ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळालेली नाही. बॉर्डर गावस्कर मालिकेमध्ये त्यांना सामान्यादरम्यान दुखापतीने सांगण्यात आले होते त्यामुळे त्याला विश्रांती दिली आहे.

कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडेच आहे पण हार्दिक पांड्याकडून उपकर्णधार पदाची कमान काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर क्रिकेट चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत.

विश्वचषक २०२३ नंतर मोहम्मद शमी प्रथमच पुनरागमन करत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो रणजी ट्रॉफी आणि टी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. याशिवाय तो सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. गुडघ्याला सूज आल्याने त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही.

ऋषभ पंतला संघात स्थान मिळालेले नाही. संघातील दुसरा यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे. फॉर्मात असलेला संजू सॅमसन यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पहिली पसंती असेल.

ऋषभ पंतला स्थान मिळालेले नाही. याशिवाय गिललाही संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचाही टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे रियान परागला संघात संधी मिळालेली नाही.

सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.

T20 मालिकेचे वेळापत्रक
बुधवार 22-जानेवारी-25 7:00 वा पहिला T20 कोलकाता
शनिवार 25-जानेवारी-25 7:00 वा दुसरा T20 चेन्नई
मंगळवार 28-जानेवारी-25 7:00 वा तिसरा T20 राजकोट
शुक्रवार 31-जानेवारी-25 7:00 वा चौथा T20 पुणे
रविवार 02-फेब्रुवारी-25 7:00 वा 5 वा T20 मुंबई

हेही वाचा :

तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक होण्याच्या कहाणीने रचला सस्पेन्सचा जाळा; ‘अपरिचित’ आणि ‘दृश्यम’ला टक्कर देणारी 120 मिनिटांची थ्रिलर!

मृत्यूपश्चातही सुरक्षित राहतील तुमचे Facebook-Instagram डिटेल्स, आजच करा ही सेटिंग !

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर “संशय कल्लोळ”चे प्रयोग