टीम इंडियाचा स्टार शर्माने उरकला साखरपुडा! होणारी बायको आहे तरी कोण?

भारतीय संघातील स्टार फलंदाज आणि आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाकडून(Team India) खेळणाऱ्या जितेश शर्माने नुकताच साखरपुडा केला आहे. भारतीय संघातील या यष्टीरक्षक फलंदाजाने साखरपुडा झाल्याची बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिली आहे. जितेश शर्माच्या होणाऱ्या पत्नीचं नाव शालका असं आहे. त्याने दोघांचे फोटो शेअर करत हटके कॅप्शनही दिलं आहे.

जितेश शर्माने कपल फोटो इंस्टाग्रामवर(Team India) अपलोड करताच, फॅन्ससह भारतीय खेळाडूंनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, ‘ भाऊ आणि वहिनी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा.’

तर मराठमोळ्य ऋतुराज गायकवाडनेही कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने, ‘शादीशुदा क्लबमध्ये एन्ट्री.’ असं लिहिलं आहे. यासह मोहसिन खान, वॉशिंग्टन सुंदर आणि पंजाब किंग्ज संघाचे माजी प्रशिक्षक वसीम जाफरनेही कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेश शर्माच्या होणाऱ्या पत्नीचं नाव शालका मकेश्वर असं आहे.माध्यमातील वृत्तानुसार, शालकाने प्रो राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये B.E. केलं आहे. यासह तिने यशवंतवराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजियरिंगमधून VLSI डिजाईनमधून M.Tech केलं आहे. सध्या ती एका सॉफ्टवेअर कंपनीत, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी यंत्रमागधारक संघटनेचे विज सवलतीसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

‘कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये, याबाबत मी…’; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

ख्यातनाम शिल्पकार कै. सदाशिव साठे यांनी साकारलेल्या शिल्पाकृतींचे मुंबईत शिल्प प्रदर्शन