टीम इंडिया दिसणार नव्या रुपात! भारताची नवी जर्सी…

भारतीय महिला संघ लवकरच नव्या रंगात दिसून येणार आहे. बीसीसीआयने(team india) भारतीय वनडे संघाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या हस्ते ही जर्सी लॉन्च करण्यात आली. या जर्सी लॉन्चच्या कार्यक्रमावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील उपस्थित होती. या जर्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

ही जर्सी अॅडिडासकडून बनवण्यात आली आहे. (team india)भारतीय संघाची यापूर्वीची जर्सी पाहिली, तर ती पूर्णपणे निळ्या रंगाची होती. यासह खांद्यावर ३ पट्ट्या होत्या. वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळी या पट्ट्या तिरंगी रंगात रंगवण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी सुरुवातीपासूनच तिरंगी पट्ट्या आहेत.

ही जर्सी केवळ भारतीय महिला संघासाठी नसून पुरुष संघासाठी देखील असणार आहे. भारतीय महिला संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळताना दिसून येणार आहे.

भारतीय पुरुष संघाबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघ फ्रेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा सामना करताना दिसून येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. या स्पर्धेतही भारतीय संघ ही जर्सी घालून मैदानात उतरेल.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन ५६ सेंकदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जय शहा आणि हरमनप्रीत कौर जर्सी लॉन्च करताना दिसून येत आहेत. लॉन्च केल्यानंतर हरमनप्रीत कौर आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? दीपक केसरकरांनी तारीख सांगितली

आज राशी परिवर्तन योगासह बनले अनेक शुभ योग; 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार

मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत