टीम इंडिया ‘या’ सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अगदी दररोज याबद्दल अनेक अपडेट्स येत आहेत. दरम्यान टीम इंडियाचा(Team India) पाकिस्तान दौरा रद्द झाल्याची एक गोष्ट निश्चित झाली आहे. पण आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने नवा दावा केला आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित आतील गोष्ट सांगितली आहे. बासित अलीनुसार, भारत नॉकआउट सामन्यासाठी पाकिस्तानचा दौरा करेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषवण्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. परंतु अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे क्लिअर झाले आहे की पाकिस्तान क्रिकेट(Team India) बोर्ड एका अटीसह हायब्रीड मॉडेलसाठी तयार आहे.

पीसीबीने 2031 पर्यंत भारतात आयोजित केलेल्या सर्व स्पर्धा हायब्रीमॉडेलवर होतील अशी अट त्यांनी घातली आहे. पण आयसीसीने ही अट फक्त २०२७ पर्यंत मर्यादित केले. मात्र, सध्या तरी आयसीसीकडून याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट मिळालेले नाही. आयसीसी स्पर्धेचे वेळापत्रक केव्हाही जाहीर करू शकते.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला की, “चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण भारतातील कोणीतरी मला वेळापत्रक पाठवले आहे ज्यात दोन्ही सेमीफायनल पाकिस्तानमध्ये आहेत. ज्या व्यक्तीद्वारे हे वेळापत्रक पाठवण्यात आले होते, तेच भारतात वेळापत्रक सुरू आहे.”

बासिल अली पुढे म्हणाला, ‘भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडेल हे शक्य नाही. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत दिसणार आहेत. भारत उपांत्य फेरीत खेळणार हे निश्चित आहे. अंतिम फेरीत काय होते ते नंतर दिसेल, आता वेळापत्रकाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.” आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक कधीही जाहीर करू शकते.

हेही वाचा :

रील बनवताना आईचे मुलीकडे दुर्लक्ष झाले अन् चिमुकली रस्त्यावर…VIDEO 

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, आता मलायका पुन्हा प्रेमात? ‘या’ कुल बॉयसोबतचा फोटो समोर

BEST बसचालक दारू पिल्याचा आरोप; शिवसेना आमदाराने सांगितलं खरे सत्य, म्हणाले ‘घाबरून त्याने…’