टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित फिस्कटणार; दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता

टी20 (t 20) वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना भारत बांग्लादेश यांच्यात होणार आहे. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात काही गडबड झाली तर पुढचं आव्हान ऑस्ट्रेलियाचं असणार आहे. त्यामुळे काहीही करून हा सामना जिंकावाच लागणार आहे. तर बांग्लादेश पराभूत झाला तर शर्यतीतून एक स्पर्धक बाहेर पडेल. पण अँटिग्वा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे हे गणित फिस्कटण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार भारत बांग्लादेश हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरु होईल. तेव्हा भारतातील वेळ रात्री 8 वाजताची असेल. हवामान खात्यानुसार दिवसभरात 23 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. बांग्लादेश ऑस्ट्रेलिया सामन्यातही असंच काहीसं झालं. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 28 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे हे गणित लक्षात ठेवावं लागेल.

जर पाऊस पडला आणि सामना (t 20) रद्द करण्याची वेळ आली तर गुणतालिकेतील सर्वच चित्र बदलून जाईल. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. सामना रद्द झाल्यास भारत बांग्लादेश या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. भारताचे 3 गुण होतील, तर बांगलादेशच्या खात्यात 1 गुण जमा होईल. बांगलादेशचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी, भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. बांगलादेशने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं तर 3 गुण होतील. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर 3 गुण राहतील. अशात नेट रनरेट खूपच महत्त्वाचा ठरेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (t 20)
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव/ मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

बांग्लादेश : तनजीद हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहीद हृदयॉय, मुहम्मदउल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनजीम हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.

हेही वाचा :

ओला ईलेक्ट्रिकमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी

शेतकऱ्यांसाठी युवकानं लढवली शक्कल, तयार केलं भन्नाट तंत्रज्ञान 

पाच बायका फजिती ऐका, ‘वटपौर्णिमे’च्या दिवशी ‘बाई गं’चा धमाकेदार टीझर रिलीज