रोहित शर्मावर संघ व्यवस्थापन नाराज; IPL 2025 नंतर कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेणार..

सध्या भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये रोहित शर्माचे(Rohit Sharma) नाव घेतले जाऊ लागले आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने टीम इंडियाचा स्तर खूप उंचावला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

यानंतर भारताने 2024 साली T20 विश्वचषक जिंकला आणि त्याच वर्षी रोहित शर्माच्या(Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपदही आपल्या नावे केले. त्यानंतर तो कसोटी संघात कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. पण टीम इंडियाच्या निवडकर्त्यांकडून 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून 3-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील संघाचा पराभव झाला होता. यानंतर भारतीय संघासाठी डब्ल्यूटीसीच्या मार्गावर इंग्लंडविरुद्ध मालिका होणार आहे.

पीटीआयच्या रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘तांत्रिकदृष्ट्या रोहित शर्मा(Rohit Sharma) इंग्लंड मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार आहे. सिडनी कसोटीत त्याने स्वतःला सामन्यापासून दूर ठेवले होते, जिथे त्याने सर्वांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की संघाला खराब फॉर्ममध्ये असलेल्या अनेक फलंदाजांसह खेळत राहणे योग्य ठरणार नाही.’

यानंतर बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘ऑस्ट्रेलिया कसोटीनंतर भारताने एकही कसोटी सामना खेळलेला नाही, त्यामुळे कसोटी कर्णधारपदात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, रोहितने देखील कधीही असे म्हटले नाही की त्याला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही.’

तसेच तो तो म्हणाला की, ‘आयपीएलदरम्यान निवड समितीला सुट्टी मिळते. त्यामुळे साहजिकच सर्व सामने टेलिव्हिजनवर दाखवले जात असल्याकारणाने त्यांना नेहमी प्रवास करण्याची गरज भासत नसते. जोपर्यंत त्यांच्याकडे विशिष्ट रणनीती नसेल किंवा एखाद्या विशिष्ट खेळाडूला जवळून पाहायचे नसेल तर ते प्रवास करत नाहीत.’

भारतीय संघ व्यवस्थापन भविष्यातील योजनांवर लक्ष ठेवून आहे. सध्या, व्यवस्थापन भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला भावी कसोटी कर्णधार म्हणून विचारात करत आहे. पण बुमराहचा फिटनेस हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा स्वत:ला सिद्ध केले आहे.

आयपीएलदरम्यान संघ व्यवस्थापन इंग्लंड दौऱ्यासाठी खेळाडूंच्या निवडीचा विचार करणार सल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत गौतम गंभीरचा निर्णय देखील महत्त्वाचे ठरणार आहे. गंभीरचा सध्याच्या फॉर्मवर खूप विश्वास आहे याची माहिती सर्वांना आहे. आता प्रशिक्षकाच्या दृष्टीने रोहित शर्मा या दौऱ्यासाठी फिट होतो की नाही? हे बघणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा :

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, तब्बल 100 पदाधिकारी देणार राजीनामा

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!