जपानमधील 40 वर्षीय डाइसुके होरी हा गेल्या 12 वर्षांपासून दररोज फक्त 30 मिनिटे झोप(sleep)घेत असल्याचा दावा करतो. ताजातवाणे आणि फीट राहण्यासाठी सहा तासांची झोप आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत असताना, होरीने आपल्या शरीराला फक्त 30 मिनिटांच्या झोपेसाठी प्रशिक्षित केले आहे.
होरी म्हणतो की, कमी झोपेमुळे त्याच्या कार्यक्षमता आणि उत्साहात वाढ झाली आहे. त्याच्या मते, चांगल्या झोपेची गुणवत्ता महत्त्वाची असते, दीर्घ झोप नाही. याशिवाय, तो लोकांना कमी झोप घेण्याचे प्रशिक्षणही देतो.
होरीच्या या दाव्याचे सत्य पडताळण्यासाठी जपानच्या योमीउरी टीव्हीने एका रियलिटी शोमध्ये तीन दिवस त्याचे निरीक्षण केले, ज्यात दिसून आले की तो प्रत्यक्षात दिवसात फक्त 26 मिनिटे झोप घेतो, तरीही तो दिवसभर ताजातवाणे आणि उत्साहित असतो.
2016 मध्ये होरीने ‘जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशन’ सुरू केली, जिथे तो लोकांना चांगल्या गुणवत्तेच्या झोपेसाठी मार्गदर्शन करतो. 2100 हून अधिक लोक त्याच्या क्लासेसचा लाभ घेत आहेत.
हेही वाचा:
गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन: प्रवाशांचा खोळंबा, ५९ आगारांची सेवा ठप्प
कागलमध्ये शरद पवारांचा हल्लाबोल: ‘संकटकाळी सोडून गेलेल्यांचा हिशोब करायचा आहे’
लाडकी बहीण योजनेवर गैरप्रकार करणार्यांना कडक कारवाईची चेतावणी; मुख्यमंत्र्यांचा इशारा