भोगावती : राशिवडे ते शिरगाव (ता.राधानगरी) या मार्गावर भरधाव मालवाहू टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. या झालेल्या भीषण अपघातात(accident) दुचाकीवरील पती जागीच ठार झाला. तर अत्यवस्थ पत्नीचा उपचारापूर्वीच कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.
संजय वसंत कांबळे (वय 48, रा.पुंगाव ता.राधानगरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर सुरेखा संजय कांबळे (वय 40) असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. राशिवडे ते येळवडे दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. याची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
संजय कांबळे यांची पत्नी भोगावती येथील एका बझारमध्ये काम करत होती. दररोजच्यानुसार पती संजय कांबळे पत्नी सुरेखाला घेऊन दुचाकी (एमएच 09 एएम 1758) वरुन भोगावतीकडून पुंगाव गावाकडे जात होते. तर येळवडेकडून समोरुन भरधाव येणारा मालवाहू टेम्पो (एमएच 09 सीयू 8629) याने रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात(accident) पती संजय कांबळे जागीच मृत्युमुखी पडले. तर पत्नी सुरेखा कांबळे गंभीर जखमी झाल्याने व त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
अपघातानंतर टेम्पोचालक नामदेव परीट (रा.राशिवडे) हा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मात्र, कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार चालू असतानाच पत्नी सुरेखाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक विवाहित व तीन अविवाहित मुली, तसेच आजारी आई आहे.
अपघातात टेम्पोने उजवीकडे मोटारसायकलसह पती-पत्नीला सुमारे 15 ते 20 फूट फरफटत आणले होते. त्यानंतर भरधाव टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला शेतात घुसला असून, त्यामुळे सिमेंटचा विद्युत खांब मोडून पडला आहे. अपघातांची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा :
Lucknow Super Giants मधून के एल राहुलचा पत्ता कट?
पेट्रोल आणि डिझेल ५ रुपयांनी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिवाळीचं मोठ गिफ्ट
शरद पवारांनी केलेली ‘नक्कल’ अजितदादांच्या जिव्हारी लागली! अजित पवार म्हणाले…