भयंकर! कारच्या धडकेत गरोदर महिला हवेत फुटबॉलसारखी उडाली Video

पुण्याच्या निघोजेमध्ये अज्ञात वाहनाने गर्भवती(pregnant)महिलेला पाठीमागून जोरात धडक देऊन जखमी केलं आहे. या घटनेचा थरार जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद झाला आहे. श्रद्धा येळवंडे, असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. संबधित कारने महिलेला उडवलं आहे. यावेळी महिला फुटबॉलसारखी उडाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा अपघात पाहून अंगावर काटाच येतो.

अपघातात जखमी झालेल्या श्रद्धा येळवंडे या गर्भवती(pregnant) आहेत. त्यांचं बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अज्ञात वाहन चालकाचा पिंपरी-चिंचवडचे महाळुंगे पोलीस शोध घेत आहेत. हा अपघात शनिवारी (८ जून) रोजी सायंकाळी घडला आहे. अपघाताचं भीषण दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. कारच्या धडकेत महिला फुटबॉलसारखी उडाल्याचं दिसत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास देहू-निघोज या रस्त्यावर बालिंगवस्ती या ठिकाणी श्रद्धा येळवंडे या रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने चालत जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील कारने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत श्रद्धा येळवंडे उडून खाली पडल्याचं दिसत आहे. गाडी अतिशय भरधाव वेगात असल्याचं समोर आलं आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या अपघातात श्रद्धा येळवंडे जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, धडक दिल्यानंतर कार चालक न थांबताच त्या ठिकाणाहून फरार झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकाचा महाळुंगे पोलीस शोध घेत आहेत. ही महिला दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावली असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा :

मोदी मंत्रिमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी, कुणाला लॉटरी ?

अजित पवार गटाला मोठा धक्का! केंद्रात एकही मंत्रिपद नाही?

‘मंत्रीपदाची ऑफर होती पण, राष्ट्रवादीनेच नाकारली..’ अजित पवार गटाला का वगळलं?