छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या एका भीषण अपंघातामध्ये(accident) एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दीड महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरात असलेल्या टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात(accident) घडला आहे. दारू पिऊन भरधाव वेगात स्कॉर्पिओ चालवणाऱ्या दोन तरुणांनी दुभाजक ओलांडून पलीकडे जाणाऱ्या क्विड कारला जोरदार धडक दिली. याच क्विड कारमधून अमरावती येथील अभियंते अजय देसरकर आपल्या कुटुंबासहीत पुण्याला जात होते त्यावेळेस हा अपघात घडला.
मरण पावलेल्यांमध्ये मृणाली अजय देसरकर ,आशालता हरिहर पोपळघट, अमोघ देसरकर, अजय देसरकर या चौघांचा समावेश आहे. यापैकी अमोघ हा केवळ दीड महिन्यांचा चिमुकला होता. अजय देसरकर अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू जाला. या प्रकरणामध्ये मद्यपान करुन कार चालवणाऱ्या स्कॉर्पिओमधील दोन्ही तरुणांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
पोलिसांची ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ संकल्पना: ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना
महायुतीच्या मंत्र्याकडून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी गणरायाला साकडे
राहुल गांधींचे देश जोडणारे काम, भाजपाला लोकसभेत जनतेने दिले उत्तर; आता पुढे काय?: रमेश चेन्नीथला