पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात(political news) विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळींचे पक्षबदल होताना दिसत आहे. असे असताना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्था पसरली आहे. आघाडीचे अनेक नेते पक्षांतर करण्याच्या प्रयत्नात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) व भाजपमध्ये इन्कमिंग वाढले आहे.
एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे(political news) गटाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही अधिक्र सक्रिय होऊन शिंदे सेना ठाकरे गटाला धक्के देत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन टायगर’संदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असा दावा केला होता. त्यानुसार, आता पडद्यामागून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
अनेक माजी आमदारांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश केला जाणार आहे. यात काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे. सूत्रानुसार, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वात 5 माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून ते सामंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यात 2 काँग्रेस नेते आणि 4 माजी आमदार असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे(political news) माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची गुरुवारी भेट घेतली. काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हुसेन दलवाई यांनी पक्षप्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे.
शिवसेने (एकनाथ शिंदे) च्या संपार्कात काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर, कोथरूडचे माजी आमदार (ठाकरे गट) चंद्रकांत मोकाटे, रत्नागिरीचे माजी आमदार (ठाकरे गट) गणपत कदम, संगमेश्वरचे माजी आमदार (ठाकरे गट) सुभाष बने, कांग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
अहिल्यानगर शहरातील नाराज उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर व नगरसेवकांनी गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरातील उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शिवसेने (शिंदे) त प्रवेश केला.
हेही वाचा :
विकी कौशल करणार कबीर खानसोबत एकत्र काम?
सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम! ‘या’ 5 गोष्टींबाबत लागू होणार नवीन नियम
भारतात बनणारी ‘ही’ कार आता जपानमध्ये घालणार धुमाकूळ