सांगली: महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या (political)उपस्थितीत गुरुवारी कडेगावमध्ये झालेल्या कार्यक्रमाकडे शिवसेना ठाकरे गटाने पाठ फिरवल्याचे स्पष्ट दिसून आले. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते उपस्थित असताना, ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली.
विशेषतः सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांची पाठराखण आणि शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा पराभव यामागील प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्यामुळेही हा वाद अधिक गडद झाला.
या वादामुळे सांगलीतील काँग्रेस आणि ठाकरे गटातील फूट उघड झाली असून, दोन्ही पक्षांच्या संबंधांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
“सशस्त्र दलांनी कायम सज्ज राहावे”: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सतर्कतेचा इशारा
सेल्फी काढताना पाय घसरून तरुण आणि तरुणी इंद्रायणीत बुडाले; कुंडमळा येथील धक्कादायक घटना
राज्य कौशल्य विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार